टोमॅटोच्या वाढत्या दराचा परिणाम फक्त सर्वसामान्यांवरच नाही, तर सुपरस्टार्सवरही होत आहे. याबाबत बॉलीवू़डचा अन्ना म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सुनील शेट्टी नुकतंच एका मुलाखतीत बोलला आहे. यावेळी सुनील शेट्टीनं टोमॅटो महागल्यानं चिंताही व्यक्त केली आहे.

‘आज तक’च्या संकेतस्थळाशी बोलताना सुनील शेट्टी म्हणाला की, “माझी पत्नी एक-दोन दिवसांचा भाजीपाला घरी आणते. आम्ही जास्त करून ताज्या भाज्यांचा वापर करतो. सध्या टोमॅटोचे दर वाढत आहेत, याचा परिणाम आमच्या स्वयंपाकघरावर झाला आहे. मी या दिवसात टोमॅटो खाणं कमी केलं आहे. लोकांना असं वाटतं की, सुपरस्टार आहेत, त्यांच्यावर महागाईचा काय परिणाम होत नाही. असं काही नसतं. आम्हीही या महागाईला सामोर जात असतो.”

हेही वाचा – सोनम कपूरनं कंगनाच्या इंग्रजीची उडवली खिल्ली; ‘कॉफी विथ करण’चा जुना व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री म्हणाली, “चित्रपटमाफियाबरोबर… “

हेही वाचा – ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात ‘त्या’ दोघांचीही कामगिरी महत्त्वाची; केदार शिंदेंच्या पोस्टनं वेधलं लक्ष

“मी एका ॲपवरून भाज्या मागवतो. यावरचे तुम्ही भाज्यांचे दर पाहिलात, तर आश्चर्याचा धक्का बसेल. इतर बाजारभावापेक्षा या ॲपवर स्वस्तात भाज्या मिळतात. आता फक्त स्वस्त मिळतं म्हणून मी हा ॲप वापरत नाही, तर या ॲपवर ताज्या भाज्या असतात. तसेच या भाज्या कुठून आल्या आहेत, कुठल्या मातीचा वापर केला आहे, या सर्वांची माहिती या ॲपवर दिली जाते. त्यामुळे मी या ॲपवरून भाजीपाला खरेदी करतो. या ॲपमुळे शेतकऱ्यांना खूप फायदा होतो. त्यांच्या शेतात पिकवलेला भाजीपाला थेट लोकांपर्यंत पोहोचतो.”

हेही वाचा – “लग्न हा एक खेळ” अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा असं का म्हणाला?, पाहा व्हायरल व्हिडीओ

पुढे सुनील शेट्टी म्हणाला की, “मी एक अभिनेता असलो तरी मी एक हॉटेलवाला आहे. प्रत्येक गोष्टी खरेदी करताना मोलभाव करून घेतो. आता जर महागाईची समस्या आहे आणि टोमॅटोचे दर वाढत असतील, तर खाण्याबाबत थोडी तडजोड करावी लागेल, जी मी करत आहे. महागाईवर एक उपाय म्हणून माझ्या खंडाळ्याच्या फार्महाऊसमध्ये मी खूप साऱ्या भाजीपाल्याची झाडं लावली आहेत.”

Story img Loader