बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या विधानामुळे चर्चेत असते. अलीकडेच ती सपा नेते फहाद अहमदसोबतच्या लग्नामुळे चर्चेत होती. स्वरा भास्कर ट्विटरवर खूप सक्रिय असते. प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडत असते. अनेकदा तिला यासाठी ट्रोलही व्हावे लागले आहे. आता पुन्हा स्वरा आपल्या नव्या विधानामुळे चर्चेत आली आहे. भारतात राहण्याबाबत तिने मोठं विधान केलं आहे. या विधानानंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- “मी फक्त…”; बॉलिवूडमधील राजकारणाबद्दल केलेल्या ‘त्या’ वक्तव्याबाबत प्रियांका चोप्राने दिलं स्पष्टीकरण

स्वरा भास्करने फुलांचे काही फोटो शेअर केले आहेत. पोस्टबरोबर तिने या देशात तिला कसे वाटते याबाबतही लिहिले आहे. स्वराने लिहिलंय “मी हे आधीही सांगितले आहे, विवेकबुद्धी असणे आणि आज भारतात राहणे म्हणजे सतत निराशाजनक रागाच्या स्थितीत जगणे. या फुलांना बघा…” स्वरानेही या पोस्टबरोबर तुटलेले हृदय दाखवले आहे.

स्वराच्या या पोस्टनंतर नेटकरी भडकले आहेत. पोस्टवर कमेंट करत यूजर्सनी स्वरावर निशाणा साधला आहे. महेश्वर नावाच्या युजरने लिहिले, “तुम्ही सीरिया, इराण, इराक, येमेन किंवा पाकिस्तानचे तिकीट बुक करू शकता…” शिवांश नावाच्या युजरने लिहिले, “मग पाकिस्तानला जा.” एस आनंद यांनी लिहिले, “मी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतात आनंदी आणि सुरक्षित आहे. मला वाटतं तुझी मानसिकता बदलायला हवी.”

हेही वाचा- “यार गौरी तू…”; पत्नीने शेअर केलेल्या फॅमिली फोटोवर शाहरुख खानची मजेशीर कमेंट

एनसीईआरटीच्या पुस्तकांमधून मुघल शासकांचे धडे काढून टाकण्यात आले आहेत. इयत्ता ११वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना यापुढे मुघलांबद्दल वाचता येणार नाही. याप्रकरणी स्वरा भास्करने नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटरवर स्वरा भास्करने सरकारला सवाल करत आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, “या देशात अनंत अज्ञान आहे! निरक्षरांना मत द्या, प्रत्येक संस्था निरक्षर करा, निरक्षर लोक निर्माण करा… हे न संपणारे चक्र आहे!”

स्वराच्या या ट्वीटवरुन नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. नीरज कुमार दुबे नावाच्या युजरने लिहिले की, “तुम्हाला मुघलांबद्दल इतकी आपुलकी आधी होती की आता? तसे, तुम्हा लोकांना भीती वाटणे आणि काळजी वाटणे स्वाभाविक आहे कारण जेव्हा नवीन पिढीला खऱ्या राष्ट्रीय वीरांची आणि देशाचा खरा आणि गौरवशाली इतिहास कळेल तेव्हा तुमची दुकानदारी नक्कीच बंद होईल. आणि हो, निरक्षर होऊ नका, जय हिंद म्हणा.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor swara bhaskar trolled by netizens after tweeted that living in india is depressing dpj
Show comments