अभिनेता वरुण धवन सध्या ‘बेबी जॉन’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. २५ डिसेंबरला वरुणचा हा नवा चित्रपट प्रदर्शित झाला. अ‍ॅटली कुमार दिग्दर्शित ‘बेबी जॉन’ चित्रपटात वरुण धवनसह अभिनेते जॅकी श्रॉफ, कीर्ति सुरेश, वामिका गब्बी, सान्या मल्होत्रा आणि राजपाल यादव महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.

वरुणच्या ‘बेबी जॉन’ चित्रपटाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. पहिल्या दिवशी वरुणच्या चित्रपटाने ११.२५ कोटींची कमाई केली होती. पण त्यानंतर चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी ‘बेबी जॉन’ चित्रपटाने अनुक्रमे ४.७५ कोटी, ३.५९ कोटींची कमाई केली आहे. अशातच वरुण धवन कुटुंबासह न्यू इअर सेलिब्रेशनसाठी निघाला आहे. मुंबई विमातळावरील त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये अभिनेत्याच्या सहा महिन्यांच्या चिमुकल्या लेकीची पहिली झलक दिसली आहे.

urmila kothare car accident video
मोठी बातमी! अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना चिरडलं, एकाचा मृत्यू; घटनास्थळावरील व्हिडीओ आला समोर
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
suresh dhas prajakta mali on santosh deshmukh murder
Prajakta Mali: प्राजक्ता माळीचं नाव का घेतलं? सुरेश धस यांनी मांडली भूमिका; तक्रारीच्या मुद्द्यावर म्हणाले…
preity zinta salman khan dating rumours
“तू सलमान खानला डेट केलं आहेस का?” चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत प्रीती झिंटा म्हणाली, “तो माझा…”
Ranbir Kapoor alia bhatt daughter raha Kapoor says bye to paps video goes viral
Video: पापाराझींनी आवाजात देताच राहाची ‘ती’ कृती; आलिया-रणबीर लेकीला पाहून लागले हसायला
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली नाही’, डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस्थळाच्या मागणीवर प्रणव मुखर्जींच्या लेकीचा संताप
Man Travelled Hanging Under Train
Madhya Pradesh : धक्कादायक! रेल्वेखाली चाकांजवळ लटकून तरुणाचा तब्बल २९० किलोमीटरचा प्रवास; Video व्हायरल
Shocking Viral video young girld fall on railway track while talking on phone with boyfriend video goes viral
VIDEO: बापरे! बॉयफ्रेंडशी बोलता बोलता ती रेल्वे ट्रॅकवर पडली; इतक्यात ट्रेन आली अन्…; पुढे जे घडलं पाहून हैराण व्हाल

हेही वाचा – “४ कपडे अन् एक छोटीशी बॅग…”; ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्याने मुंबईत घेतलं हक्काचं घर, व्हिडीओमध्ये दाखवली पहिली झलक

अभिनेता वरुण धवन आज सकाळी पत्नी नताशा दलाल आणि चिमुकली लेक लारासह मुंबई विमानतळावर पाहायला मिळाला. याचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ने इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला नताशा लेकीचा चेहरा लपवत चालताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर विमानतळात एन्ट्री करताना कागदपत्र पडताळणीच्यावेळी वरुण धवनच्या लेकीची पहिली झलक दिसत आहे.

हेही वाचा – Video: पापाराझींनी आवाजात देताच राहाची ‘ती’ कृती; आलिया-रणबीर लेकीला पाहून लागले हसायला

वरुण धवनच्या चिमुकल्या लेकीचा हा व्हिडीओ सध्या खूप सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वी वरुणने आपल्या कुटुंबासह फोटो शेअर करून चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी त्याने लेकीचा चेहरा दाखवला नव्हता.

हेही वाचा – Video: पत्नीच्या वाढदिवसानिमित्त ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची खास पोस्ट; किती वर्षांची झाली प्राजक्ता? म्हणाला…

वरुणच्या लेकीच्या नावाचा अर्थ

३ जून २०२४ रोजी नताशा दलालने गोंडस मुलीला जन्म दिला. त्यामुळे धवन कुटुंबात लक्ष्मीचं आगमन झालं. लग्नाच्या तीन वर्षांनंतर वरुण धवन आणि नताशा दलाल आई-बाबा झाले. अभिनेत्याने लेकीचं नाव ‘लारा’ असे ठेवले. ‘लारा’ हा लॅटिन, ग्रीक आणि रशियन शब्द आहे. याचा अर्थ सुंदर आणि तेजस्वी असा होतो. तसंच ‘लारा’ नावाचा अर्थ वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये वेगवेगळा आहे.

Story img Loader