अभिनेता वरुण धवन सध्या ‘बेबी जॉन’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. २५ डिसेंबरला वरुणचा हा नवा चित्रपट प्रदर्शित झाला. अॅटली कुमार दिग्दर्शित ‘बेबी जॉन’ चित्रपटात वरुण धवनसह अभिनेते जॅकी श्रॉफ, कीर्ति सुरेश, वामिका गब्बी, सान्या मल्होत्रा आणि राजपाल यादव महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.
वरुणच्या ‘बेबी जॉन’ चित्रपटाला पाहिजे तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. पहिल्या दिवशी वरुणच्या चित्रपटाने ११.२५ कोटींची कमाई केली होती. पण त्यानंतर चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी ‘बेबी जॉन’ चित्रपटाने अनुक्रमे ४.७५ कोटी, ३.५९ कोटींची कमाई केली आहे. अशातच वरुण धवन कुटुंबासह न्यू इअर सेलिब्रेशनसाठी निघाला आहे. मुंबई विमातळावरील त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये अभिनेत्याच्या सहा महिन्यांच्या चिमुकल्या लेकीची पहिली झलक दिसली आहे.
अभिनेता वरुण धवन आज सकाळी पत्नी नताशा दलाल आणि चिमुकली लेक लारासह मुंबई विमानतळावर पाहायला मिळाला. याचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ने इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुरुवातीला नताशा लेकीचा चेहरा लपवत चालताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर विमानतळात एन्ट्री करताना कागदपत्र पडताळणीच्यावेळी वरुण धवनच्या लेकीची पहिली झलक दिसत आहे.
हेही वाचा – Video: पापाराझींनी आवाजात देताच राहाची ‘ती’ कृती; आलिया-रणबीर लेकीला पाहून लागले हसायला
वरुण धवनच्या चिमुकल्या लेकीचा हा व्हिडीओ सध्या खूप सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वी वरुणने आपल्या कुटुंबासह फोटो शेअर करून चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी त्याने लेकीचा चेहरा दाखवला नव्हता.
वरुणच्या लेकीच्या नावाचा अर्थ
३ जून २०२४ रोजी नताशा दलालने गोंडस मुलीला जन्म दिला. त्यामुळे धवन कुटुंबात लक्ष्मीचं आगमन झालं. लग्नाच्या तीन वर्षांनंतर वरुण धवन आणि नताशा दलाल आई-बाबा झाले. अभिनेत्याने लेकीचं नाव ‘लारा’ असे ठेवले. ‘लारा’ हा लॅटिन, ग्रीक आणि रशियन शब्द आहे. याचा अर्थ सुंदर आणि तेजस्वी असा होतो. तसंच ‘लारा’ नावाचा अर्थ वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये वेगवेगळा आहे.
© IE Online Media Services (P) Ltd