बॉलीवूड अभिनेता वरुण धवन सध्या अॅटली दिग्दर्शित ‘वीडी 18’ चित्रपटाच शुटिंग करत आहे. पण याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान वरुण धवनला दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात वरुणने स्वतः सोशल मीडियावरद्वारे माहिती दिली आहे.
हेही वाचा – ‘जवान’च्या शूटिंगदरम्यान शाहरुख खानने मागितली होती सहकलाकारांची माफी; किस्सा सांगत गिरीजा ओक म्हणाली…
अभिनेता वरुण धवन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. नुकताच त्याने इन्स्टाग्रामवर स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यामध्ये पायाला दुखापत झाल्याचं सांगत आहे. व्हिडीओत वरुण म्हणतोय की, “‘वीडी 18’ या चित्रपटाच्या सेटवरील दिवस खूप कठीण होता. कारण माझ्या पायाला दुखापत झाली आहे. शूटिंगदरम्यान ही पायाला दुखापत झाली आहे. मात्र ही दुखापत कशी झाली? हेच मला समजतं नाहीये. पण आता मी आइस थेरपी घेत आहे.” या व्हिडीओत वरुण बर्फाच्या पाण्यात पाय टाकून बसलेला पाहायला मिळत आहे.
हेही वाचा – शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘जवान’ चित्रपटासाठी अभिनेत्री गिरीजा ओकची ऑडिशन कशी झाली? तिनेच सांगितला किस्सा
हेही वाचा – Video: राज ठाकरे यांच्यामधील खुपणारी एक गोष्ट कोणती? अभिजीत बिचुकले म्हणाले…
दरम्यान, वरुणच्या ‘वीडी 18’ या चित्रपटाची निर्मिती दाक्षिणात्य चित्रपट निर्माते कलीस करत आहे. या चित्रपटात वरुणबरोबर कीर्ति सुरेश आणि वामिका गब्बी झळकणार आहेत. माहितीनुसार, ३१ मे २०२४ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पहिल्यांदाच वरुण धवन अॅटलीबरोबर काम करत आहे.
हेही वाचा – मराठमोळ्या गिरीजा ओकने ‘जवान’साठी पहिल्या दिवशी पुण्यात केलेलं शुटिंग; ‘या’ ठिकाणाचा उल्लेख करत म्हणाली…
अलीकडेच वरुणचा ‘बवाल’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तो जान्हवी कपूरबरोबर पाहायला मिळाला होता. पण वरुण-जान्हवीच्या या चित्रपटाला प्रक्षेकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही.