Allu Arjun Arrested : अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ चित्रपट सिनेमागृहांमध्ये धुमाकूळ घालत आहे. पण याच चित्रपटामुळे तो अडचणीत सापडला आहे. अल्लू अर्जुनला आज त्याच्या हैदराबाद येथील घरातून अटक करण्यात आली आहे. ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या प्रिमियरवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता; याप्रकरणी अभिनेत्याला आज अटक झाली. त्याच्या अटकेवर अभिनेता वरुण धवनने प्रतिक्रिया दिली आहे.

अल्लू अर्जुनच्या अटकेनंतर खळबळ उडाली आहे. ४ डिसेंबरला हैदराबादमध्ये झालेल्या प्रिमियर शोमध्ये चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेत ३९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर अल्लू अर्जुनने या महिलेच्या कुटुंबाला २५ लाख रुपयांची मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आज अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केली आहे.

Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
man murder over property dispute, Mumbai ,
मुंबई : मालमत्तेच्या वादातून ३६ वर्षीय व्यक्तीची हत्या, दोघांना अटक
Dispute over fathers treatment man kills grandmother in solapur
वडिलांच्या उपचारावरून वाद; नातवाने केला आजीचा खून
Baba Siddiqui murder case Lawrence Bishnoi gang key goon suspected of involvement Mumbai news
बाबा सिद्धीकी हत्या प्रकरण: लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या महत्त्वाच्या गुंडाचा सहभागाचा संशय
youth killed on suspicion of stealing petrol
पुणे : पेट्रोल चोरीच्या संशयातून तरुणाला बेदम मारहाण; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू
13 year old girl raped and threatened Mumbai print news
१३ वर्षांच्या मुलीला धमकावून अत्याचार
Bhavesh Bhinde granted bail in Ghatkopar hoarding case seeks acquittal in court
घाटकोपर फलक दुर्घटना भावेश भिंडेची दोषमुक्ततेची मागणी

हेही वाचा – अल्लू अर्जुनने पत्नीला किस केलं अन् हसत हसत पोलिसांच्या गाडीत जाऊन बसला; अभिनेत्याचा अटकेआधीचा Video Viral

या घटनेसाठी अल्लू अर्जुनला दोषी ठरवणं चुकीचं आहे, असं मत वरुण धवनने व्यक्त केलं आहे. अल्लू अर्जुनच्या अटकेबाबत समजताच वरुण धवन म्हणाला, “जी घटना घडली ती खूप दुर्दैवी आहे. त्याबद्दल मी शोक व्यक्त करतो. पण त्याचवेळी या घटनेचा दोष फक्त एका व्यक्तीला देऊ शकत नाही.”

हेही वाचा – Allu Arjun Arrest: ‘पुष्पा’ फेम अभिनेता अल्लू अर्जुनला राहत्या घरातून अटक; ‘त्या’ घटनेप्रकरणी पोलिसांची कारवाई!

पोलीस अटक करण्यासाठी आल्यावर अल्लू अर्जुनने त्याचा नाश्ता संपवला, त्यानंतर पत्नी स्नेहा रेड्डीशी बोलल्यावर तो पोलिसांबरोबर गेला. अभिनेता हसत हसत पोलिसांच्या गाडीत बसतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत. दरम्यान, अल्लू अर्जुनला अटक करून पोलिसांनी चिक्कडपल्ली पोलीस स्थानकात नेलं आहे. महिलेच्या मृत्यूची नोंद याच पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

Story img Loader