बॉलीवूडचा ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखला जाणारा वरुण धवन सध्या ‘बेबी जॉन’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. अ‍ॅटली दिग्दर्शित ‘बेबी जॉन’ चित्रपट २५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात वरुण धवनसह अभिनेते जॅकी श्रॉफ, कीर्ति सुरेश, वामिका गब्बी, सान्या मल्होत्रा आणि राजपाल यादव महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. हा अ‍ॅक्शन ड्रामा पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. बॉक्स ऑफिसवर एकाबाजूला ‘पुष्पा २’ चित्रपट धुमाकूळ घालत असताना ‘बेबी जॉन’ चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

‘बेबी जॉन’ या चित्रपटाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. ठिकठिकाणी जाऊन चित्रपटातील कलाकार मंडळी प्रमोशन करत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘बेबी जॉन’ चित्रपटाच्यानिमित्ताने वरुण धवनने रणवीर अलाहाबादिया मुलाखत दिली. यावेळी त्याने एका चाहतीचा किस्सा सांगितला; जी अभिनेत्याच्या घरात घुसली होती.

हेही वाचा – Video: “मला लागली कुणाची उचकी…”, योगिता चव्हाणची ठसकेबाज लावणी; नेटकऱ्यांकडून होतंय भरभरून कौतुक, म्हणाले…

वरुण धवनने चाहत्यांचे हैराण करणारे किस्से सांगितले. यावेळी घरात घुसलेला चाहतीचा किस्सा अभिनेत्याने सांगितला. तो म्हणाले, “माझ्या घरात एका पॉवरफुल व्यक्तीची पत्नी घुसली होती. त्यावेळी मी कुठल्या मनस्थितीत होतो, हे मी सांगू शकत नाही. पण तिचा पती खूप पॉवरफुल व्यक्ती होती. पण त्याच्या पत्नीचा दुसऱ्यांना फसवण्यासाठी वापर केला जात होता.”

हेही वाचा – लगीनघाई! ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्रीचा ग्रहमख विधी पार पडला, फोटो आले समोर

पुढे वरुण धवन म्हणाला, “त्या चाहतीशी माझ्या नावाने कोणीतरी बोलत असायचं. तिला माझ्या घराबाबत सर्व काही माहीत होतं आणि तिला वाटतं होतं की, मी माझ्या कुटुंबाला सोडत आहे. हे खूप भयानक होतं. त्यानंतर मी पोलिसांना बोलावलं. पण, ती एका व्यक्तीबरोबर घरी आली होती आणि मग कौटुंबिक वाद झाला. महिला कॉन्स्टेबलला बोलावलं. त्यानंतर सर्व वातावरण शांत झालं.”

हेही वाचा – Video: पूजा सावंतने भावाच्या संगीत सोहळ्यात धरला ठेका, भावंडांसह केला जबरदस्त डान्स

दरम्यान, वरुण धवनसाठी घर सोडून तीन रात्र समुद्र किनारी झोपणारे चाहते त्याला भेटले आहेत. यावेळी देखील त्याने पोलिसांची मदत घेतली होती. एकेदिवशी एका चाहतीने जबरदस्तीने वरुण धवनला किस केली होती. एवढंच नव्हे तर दुसऱ्या एका चाहतीने थेट फोन नंबरही मागितला होता. त्यावेळी वरुणने खोटा फोन नंबर सांगितला.

Story img Loader