‘मसान’, ‘उरी’, ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटांच्या माध्यमांतून अभिनेता विकी कौशल प्रसिद्धीझोतात आला. मूळचा पंजाबी असलेल्या विकी कौशलचं संपूर्ण बालपण मुंबईत गेलं. अभिनेता अतिशय सामान्य कुटुंबात लहानाचा मोठा झाला. बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांसाठी विकीने सहायक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे.
हेही वाचा : प्रिया बापट : चाळीत वाढलेली बबली गर्ल ते बहुपेडी अभिनेत्री
मुंबईत बालपण गेल्यामुळे अभिनेत्याला अनेक मराठी शब्द व्यवस्थित माहिती आहेत. त्याला उत्तम मराठी सुद्धा बोलता येतं. मराठी कार्यक्रमांना हजेरी लावल्यावर विकी खास प्रेक्षकांच्या आग्रहास्तव मराठी भाषेतून संवाद साधतो. सध्या त्याच्या मराठी इन्स्टाग्राम पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
विकी कौशलने आईला मिठी मारतानाचा गोड फोटो शेअर करत त्याला मराठीत कॅप्शन दिलं आहे. विकीने कॅप्शनमध्ये “Cutiep आई !” असं म्हटलं आहे. विकीची पोस्ट पाहून मराठी कलाकारांनी अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तर, काही नेटकऱ्यांनी “आईला ‘आई’ बोलून मन जिंकलस आमचं”, “विकीच्या आईसाहेब…”, “तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे” अशा कमेंट्स विकीच्या पोस्टवर केल्या आहेत.
हेही वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप लवकरच ‘या’ चित्रपटात झळकणार; प्रथमेश परब असणार जोडीला
दरम्यान, अभिनेता विकी कौशल लवकरच ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ आणि बहुचर्चित ‘सॅम बहादूर’ या दोन चित्रपटांच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ मध्ये त्याच्यासह मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर प्रमुख भूमिका साकारणार आहे.