बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा सिनेसृष्टीतील सर्वात उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. दमदार अभिनय आणि हटके भूमिकांसाठी विकीला खास ओळखले जाते. अगदी कमी कालावधी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणून ओळखले जाते. विकी कौशल हा सध्या ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘मसान’ या चित्रपटातून त्याला ओळख मिळाली मात्र तो या चित्रपटात नव्हताच, खुद्द विकीनेच केला खुलासा.
विकी कौशल नुकताच कपिल शर्माच्या कार्यक्रमात येऊन गेला आहे. विकीने आपला पहिला चित्रपट ‘मसान’ कसा मिळवला याबद्दल खुलासा केला आहे. “ही २०१०ची गोष्ट आहे जेव्हा मला अभिनेता व्हायचे होते आणि नीरज घायवानला दिग्दर्शक व्हायचे होते. आम्ही दोघांनी ‘गँग्स ऑफ वासेपूर’मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. माझे अभिनय कौशल्य वाढवण्यासाठी मी नाटक करत होतो. २०१३ मध्ये पुण्याला जाताना आमची पुन्हा भेट झाली तेव्हा आमच्यात कामाबद्दल गप्पा झाल्या.”
“अटलजींची भूमिका साकारणं म्हणजे…” पंकज त्रिपाठींची पोस्ट चर्चेत
संभाषणादरम्यान, “मला कळले की तो एक चित्रपट बनवत आहे आणि निर्मात्याच्या शोधात आहे. नीरजने राजकुमार रावबरोबर एक पायलट प्रोमो बनवला होता. पण प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या वेळी राजकुमारच्या तारखा जुळत नव्हत्या आणि मी त्या भूमिकेसाठी उडी मारली आणि ती भूमिका मला मिळाली.”
विकी कौशल व्यतिरिक्त, मसानमध्ये संजय मिश्रा, ऋचा चढ्ढा आणि श्वेता त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका होत्या ज्यात पंकज त्रिपाठीच्या पाहुणे कलाकार म्हणून होते. २०१५मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये चित्रपटाला पुरस्कार मिळाला तर नीरजला दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.