अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि अभिनेता विजय वर्मा ही बॉलीवूडमधील जोडी सध्या चांगलीच चर्चेत आहे. ‘लस्ट स्टोरीज २’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी दोघांनी प्रेमाची कबुली दिली. जवळपास तमन्ना आणि विजय दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांचे रोमँटिक व्हिडीओ आणि फोटो सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच तमन्ना भाटियाबरोबर लग्न कधी करणार? याविषयी विजय वर्माने भाष्य केलं आहे.

अभिनेता विजय वर्माची तमन्नाशी पहिली भेट दिग्दर्शक सुजॉय घोष यांच्या ऑफिसमध्ये झाली होती. चित्रपटाच्या स्क्रिप्ट रीडिंगदरम्यान अभिनेता तमन्नाला भेटला होता. तेव्हा तमन्नाने तिच्या प्रवासाविषयी त्याला सांगितलं. मग दोघांची मैत्री झाली आणि मग मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. २०२३चे स्वागत करताना विजय आणि तमन्नाचा किसिंग व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. तेव्हापासून त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाली होती. अखेर जून महिन्यात दोघांनी एकमेकांना डेट करत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे सध्या त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. नुकतंच अभिनेत्याने लग्नाविषयी भाष्य केलं आहे.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

हेही वाचा – Video: जान्हवी कपूरबरोबर ओरीचा ‘पिंगा’ गाण्यावर जबरदस्त डान्स; व्हिडीओ झाला व्हायरल

हेही वाचा – ‘अस्तित्व’ नाटक पाहून अभिनेते अजिंक्य देव यांची प्रतिक्रिया, म्हणाले, “भरतने रडवलं…”

पिंकविलाच्या वृत्तानुसार, जेव्हा विजयला लग्नाविषयी विचारलं गेलं तेव्हा तो म्हणाला की, “मी लग्न करावं, असं कोणत्याही मुलीला वाटत नाही. याचे उत्तर मी ना माझ्या आईला देऊ शकतो ना इतर कोणाला देऊ शकत.” दरम्यान, ‘लस्ट स्टोरीज २’ या चित्रपटात तमन्ना आणि विजय इंटिमेट सीन करताना पाहायला मिळाले होते. यामध्ये दोघ पती-पत्नीच्या भूमिकेत झळकले होते.

Story img Loader