Vivek Oberoi shifted to Dubai : सुपरहिट चित्रपट देणारा विवेक ओबेरॉय एकेकाळी बॉलीवूडचा चॉकलेट बॉय होता. विवेक आताही सिनेसृष्टीत सक्रिय आहे पण तो मुंबईत राहत नाही. विवेक दुबईत राहतो, तिथे त्याचा बिझनेस आहे. आता विवेकने मुंबई सोडून दुबईला जाण्याचं कारण सांगितलं. विवेक म्हणाला की त्याचा दुबईला राहायला जाण्याचा विचार नव्हता, पण कदाचित नशीबाचे त्याच्यासाठी वेगळे प्लॅन्स होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न्यूज18 ला दिलेल्या मुलाखतीत विवेक ओबेरॉय म्हणाला, “मी सुरुवातीला काही काळासाठी दुबईला गेलो होतो, खरं तर फक्त व्यवसाय सुरू करण्यासाठी. देवाची कृपा झाली आणि आमचा व्यवसाय वाढला. व्यवसायाचा आम्ही विस्तार करत गेलो, आता आमच्याकडे ४०० लोक काम करतात.”

“मला पहाटे नारळाच्या झाडावर चढायला लावलं, घरी जेवायला बोलावलं अन् सोडून निघून गेला…”; विवेक ओबेरॉयचा अभिनेत्याबाबत खुलासा

विवेक ओबेरॉयच्या कंपन्या

“मी भारतात परत आल्यावर मी एक फिनटेक कंपनी सुरू केली, ही कंपनी सुरू करताना थोडा सामाजिक दृष्टिकोन होता. ज्या मुलांना शिक्षणासाठी कर्ज मिळू शकत नाही, त्यांना मदत करण्याचा यामागचा हेतू होता. आता कंपनी भारतातील जवळपास ४५ लाख मुलांना मदत करते. मग मी एक एज्युकेशन स्टार्टअप तयार केला जो लहान शहरातील मुलांसाठी आहे. ज्या मुलांना मोठ्या शहरांमध्ये चांगले शिक्षक मिळत नाही, त्यांना याद्वारे चांगले शिक्षण मिळते. तसेच आमचा एक कृषी स्टार्टअप आहे, ज्याद्वारे ९७ लाख भारतीय शेतकऱ्यांना मदत होत आहे,” असं विवेकने (Vivek Oberoi Start-ups) त्याच्या व्यवसायाबद्दल ‘कर्ली टेल्स’ला सांगितलं.

८०० कोटींचा पतौडी पॅलेस रंगवण्याऐवजी सैफ अली खानने लावला चुना; सोहा अली खान म्हणाली, “आजोबांचे पैसे…”

दुबईतील विवेकची कंपनी

दुबईबद्दल विवेक म्हणाला, “दुबईमध्ये रिअल इस्टेट, मोठ्या ब्रँड्सशी कोलॅबरेशन या गोष्टी आहेत. आम्ही आमची कंपनी BnW डेव्हलपमेंट्सच्या माध्यमातून जे नवीन कॅसिनो येत आहेत, त्यांच्यासाठी काही अल्ट्रा लक्झरी प्रकल्प करत आहोत. आम्ही आठ इमारती बांधत आहोत. तसेच माझ्याकडे थोडी स्टार्टअप इकोसिस्टम आहे. देवाची कृपा आहे, दुबई माझ्यासाठी आतापर्यंत चांगलं राहिलंय.”

अभिनेता विवेक ओबेरॉय (फोटो – इन्स्टाग्राम)

“गर्दीतील एकाने मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श…”, ईशा देओलबरोबर पुण्यात घडलेला धक्कादायक प्रसंग; म्हणाली, “मी त्याला…”

दुबईत राहतो, पण घर मुंबईतच

विवेक मागील तीन वर्षांपासून दुबईत राहत आहे. दुबईत सुंदर इंटिरियर असलेले त्याचे एक आलिशान घर आहे, घराभोवती बाग आहे, एक पूल आहे. “जेव्हा जेव्हा मी मुंबईला जातो तेव्हा मला मुंबई सोडावीशी वाटत नाही. तुम्ही मला विचाराल तुझं घर कुठे आहे, तर मी मुंबईच म्हणेन. मला दुबई आवडतं. मला काही वेळ इथे आणि काही वेळ दुबईत राहायला आवडतं,” असं विवेक म्हणाला.

कामाबद्दल बोलायचं झाल्यास विवेक ओबेरॉय शेवटचा रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘द इंडियन पुलिस फोर्स’ वेब सीरिजमध्ये झळकला होता. यात सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि शिल्पा शेट्टी कुंद्रा यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor vivek oberoi reveals why he left mumbai and shifted to dubai hrc