Aamir Khan: बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या चित्रपटात नव्हे तर विविध कार्यक्रमात अधिक दिसतो. काही दिवसांपूर्वी ‘इलू इलू १९९८’ या मराठी चित्रपटाच्या प्रीमियर सोहळ्यात पाहायला मिळाला होता. यावेळी आमिरने मराठीत संवाद साधत चित्रपटाचं आणि दिग्दर्शकाचं कौतुक केलं होतं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर आता आमिर खानच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. यामध्ये आमिर नाराज झाल्याचं पाहायला मिळालं. नेमकं काय घडलं? जाणून घ्या…

काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या ‘वर्ल्ड पिकलबॉल लीग’मध्ये आमिर खान सहभागी झाला होता. यावेळी त्याच्याबरोबर अली फजलदेखील होता. त्यामुळे दोघांमध्ये पिकलबॉलचा सामना पाहायला मिळाला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

‘वर्ल्ड पिकलबॉल लीग’दरम्यानच आमिर खान आणि अली फजलने पापाराझींशी संवाद साधला. यावेळी एका पापाराझीने आमिरला वयावरून प्रश्न विचारला. पापाराझी म्हणाला की, तू ६० वर्षांचा झालास. हे ऐकताच आमिर नाराज झाला आणि म्हणाला, “अच्छा? मी विसरुनच गेलो होतो. तू माझ्या लक्षात आणलंस.”

त्यानंतर बाजूला असलेला अली विचारतो, “काय म्हणाला?” तर आमिर खानने सांगितलं की, तो मला ६० वर्षांचा झालो, असं सांगत आहे. मग मिश्किलपणे हसत आमिर पापाराझीला टोला लगावतो. तो म्हणतो, “मी १८ वर्षांचा आहे.” तेव्हा पापाराझी म्हणतो, “तुमचं वय उलट होतं चाललं आहे.” यावर अभिनेता म्हणाला की, हो माझा प्रयत्न तोच आहे. वय हा फक्त आकडा आहे. तर मी १८ वर्षांचा आहे.

पुढे आमिरला विचारलं जात, “तुला जिंकण्याची खूप सवय झाली आहे. लोक घरी आराम करतात.” तेव्हा आमिर खान म्हणतो, “हो, मला जिंकायला खूप आवडतं. जिंकण्यात मजा येते.” नंतर पुढचा प्रश्न विचारत पत्रकार म्हणते, “या वयात तू खूप एनर्जेटिक आहेस. जुनैदबरोबर तू कोणता खेळ खेळतोस?” यावर आमिर खान म्हणाला, “मी आणि जुनैद क्रिकेट खूप खेळतो. पण त्याला फुटबॉल खेळायला खूप आवडतं.”

दरम्यान, आमिर खानच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो सध्या आगामी चित्रपट ‘सितारे जमीन पर’वर काम करत आहे. याशिवाय जुनैद खानच्या ‘लवयापा’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

Story img Loader