सध्या बॉलीवूड अभिनेता गोविंदा खूप चर्चेत आला आहे. एकाबाजूला तो राजकारणात पुन्हा एन्ट्री करणार असल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबर त्याची भेट झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे गोविंद पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकाच्या रिंगणात उतरणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच दुसऱ्या बाजूला गोविंदाने ३७ वर्षांनंतर पुन्हा एकदा लग्न केलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा ‘डान्स दिवाने’च्या चौथ्या पर्वात उपस्थित राहिले होते. याच सेटवर गोविंदा व सुनीता यांचं लग्न पुन्हा एकदा झालं. याचा व्हिडीओ ‘कलर्स टीव्ही’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील नवनवीन ट्विस्ट पाहून मधुराणी प्रभुलकरच्या आईची असते ‘ही’ रिअ‍ॅक्शन, अभिनेत्री म्हणाली…

या व्हिडीओत, माधुरी दीक्षित म्हणतेय की, गोविंदा तुमचं लग्न कधी झालं? आम्हाला कळलंच नाही? यावर सुनीता आहुजा म्हणतात, “आमच्याकडे लग्नाचे फोटो देखील नाहीयेत.” तर माधुरी म्हणते, “फोटो नाहीत, काही हरकत नाही. ‘डान्स दिवाने’चं कुटुंब आहे. नवरा-नवरी देखील आहेत. आज आम्ही तुमचं लग्न करू देतो.” यानंतर गोविंदा व संगीता हे दोघं एकमेकांना वर्णमाला घालताना दिसत आहेत. यावेळी गोविंदाने फिकट गुलाबी रंगाचा कुर्ता पायजमा परिधान केला होता. तर सुनीता या फिकट गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात पाहायला मिळाल्या.

हेही वाचा – Video: निवृत्त सैनिकाने उभारली कोट्यवधींची कंपनी, काम पाहून शार्क्सनी केलं सॅल्यूट, दिली ‘ही’ ऑफर

दरम्यान, कपिल शर्माच्या शोमध्ये गोविंदाने त्याची व सुनीता यांची लव्हस्टोरी सांगितली होती. सुनीता आहुजा यांच्या मोठ्या बहिणीचं लग्न गोविंदाचे मामा आनंद सिंह यांच्याशी झालं होतं. त्यावेळी गोविंदाचं स्ट्रगल सुरू होतं. त्यामुळे तीन वर्षांसाठी गोविंदा आपल्या मामाच्या घरी राहत होता. तेव्हा सुनीता आहुजाचं बहिणीच्या घरी येणं-जाण होतं होत. त्यामुळे गोविंदा व सुनीता यांची ओळख झाली. यावेळी सुनीता अवघ्या १५ वर्षांच्या होत्या. काही काळाने दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि ११ मार्च १९८७ रोजी दोघं लग्नबंधनात अडकले. पण या लग्नाचा एकही फोटो दोघांकडे आजही नाही.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actors govinda married again after 37 years with sunita madhuri dixit sunil shetty witnesses special moment video viral pps