सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. सलमान खान संबंधित सातत्याने सोमी विधान करताना दिसत आहे. तसंच काही धक्कादायक खुलासे करत आहे. अशातच आता सोमी अलीने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतविषयी विधान केलं आहे. त्यामुळे सोमी अली पुन्हा एकदा अधिकच चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने ‘रेडिट’वर ‘आस्क मी एनिथिंग’ सेशन ठेवलं होतं. या सेशनमध्ये सोमीच्या चाहत्यांनी तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. यावेळीच तिला सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाविषयी विचारलं. तेव्हा तिने सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला.

हेही वाचा – Bigg Boss 18: रुपाली भोसले भडकली ‘बिग बॉस १८’मधील ‘या’ सदस्यावर; सिद्धार्थ शुक्लाचा उल्लेख करत म्हणाली, “हा अहंकार…”

सोमी अलीला विचारलं होतं की, सुशांत सिंह रापजूपच्या प्रकरणाबाबत तुझं मत काय आहे? बॉलीवूडने ज्याप्रकारे त्याला वागणूक दिली ती खरोखरच निराशाजनक आहे. यावर सोमी अली उत्तर देत म्हणाली, “त्याची हत्याच केली होती. पण ती आत्महत्या दाखवली गेली. एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांना विचारा; ज्यांनी त्याचे शवविच्छेदन अहवाल बदलले. सुशांतचे शवविच्छेदन अहवाल का बदलले? त्यांना विचारा.”

हेही वाचा – Bigg Boss 18: रजत दलालने शायरीतून विवियन डिसेनाच्या ग्रुपला लगावला टोला; नेटकरी म्हणाले, “एक नंबर भाई…”

सोमी अलीचं उत्तर

सुशांत सिंह राजपूतचं निधन चार वर्षांपूर्वी झालं होतं. सुशांतच्या निधनाच्या चार महिन्यानंतर एम्स मेडिकल बोर्डने सुशांतची हत्या नसल्याचं सांगितलं होतं. त्यांनी हे प्रकरण आत्महत्येचं असल्याचं म्हटलं होतं. एम्स फॉरेंसिक मेडिकल बोर्डचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर गुप्ताने सुशांतच्या शरीरावर फाशीशिवाय इतर कोणत्याही खुणा नसल्याचं सांगितलं होतं.

हेही वाचा – “आजही माहेरची ओढ कायम पण वेळ कमी…”, विशाखा सुभेदारने माहेरपणाबद्दल लिहिलेल्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली, “बहिणीच्या उवा…”

दरम्यान, सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सोमी अलीने बॉलीवूडमध्ये ‘में यार गद्दार’, ‘अंत’, ‘आओ प्यार करें’ आणि ‘चुप’ यांसारखे चित्रपट केले होते. सलमानच्या रिलेशनशिपमुळे सोमी अधिक प्रसिद्धीच्या झोतात आली होती. सोमीने ‘डिस्कवरी प्लस’वरील डॉक्युसीरिज ‘फाइट ऑफ फ्लाइट २०२१’मध्ये काम केलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actors salman khan ex girlfriend somy ali claimed that sushant singh rajput was murdered pps