सध्या बॉलिवूडमध्ये सगळ्यांची लगीनघाई सुरू आहे. अली रिचा यांचा लग्नसोहळ्याची चर्चा सुरू आहे, याचवर्षी आलिया आणि रणबीर दोघे लग्नबंधनात अडकले. आता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी हे दोघे लवकरच लग्न करणार आहेत. या सगळ्यांपैकी लग्नाचा बऱ्यापैकी अनुभव घेतलेलं जोडपं म्हणजे कतरिना कैफ आणि विकी कौशल. या दोघांच्या लग्नाची आणि तिथल्या नियमांची प्रचंड चर्चा झाली, त्यावर बरेच विनोदही झाली. नुकतंच कतरिनाने तिच्या या वैवाहिक जीवनाबद्दल खुलासा केला आहे.

‘पिंकव्हीला’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये कतरिनाने तिच्या आणि विकीच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे, शिवाय त्या दोघांविषयी सोशल मीडियावर जी चर्चा सुरू असते त्यावरही तिने कटाक्ष टाकला आहे. लग्नानंतर आयुष्य बरंच बदललं असल्याचं कतरिनाने कबूल केलं आहे, कतरिना म्हणाली, “लग्न हा आयुष्यातील खूप मोठा बदल आहे. तुम्ही एका व्यक्तीबरोबर राहता, तुमचं आयुष्य घालवता, सगळ्या गोष्टी शेयर करता हे फारच सुंदर आहे. कधी तो कामानिमित्त माझ्यापासून लांब असतो, कधी मी तिच्यापासून लांब असते, हे असंच राहणार.”

tina datta talks about being single mother
३३ वर्षीय अभिनेत्री लग्न न करताच आई होणार? म्हणाली, “पतीवर अवलंबून राहणं…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
paaru fame Sharayu Sonawane revealed the reason behind hiding her marriage
पारूने खऱ्या आयुष्यातलं लग्न का लपवून ठेवलं होतं? कारण सांगत म्हणाली, “अचानक मी…”
Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding actress reacts on trolling
“पियुष माणूस म्हणून कोणापर्यंतच पोहोचलेला नाही” लग्नाबद्दल पहिल्यांदाच बोलली सुरुची अडारकर; म्हणाली, “त्याचा भूतकाळ हा…”
krushna abhishek sister aarti singh met
८ वर्षे बहिणीच्या जन्माबद्दल अनभिज्ञ होता ‘हा’ कॉमेडियन; भेटीचा प्रसंग सांगत म्हणाला, “रक्षाबंधनला तिला भेटण्यासाठी…”
2 women marry each other
नवऱ्याचा छळ आणि व्यसनाधीनतेला कंटाळून, दोन महिलांनी एकमेकींशी बांधली लग्नगाठ
karan veer mehra second wife got married
करण वीर मेहराच्या दुसऱ्या बायकोने केलं लग्न, अभिनेत्रीने मंदिरात बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर
Aparna Vinod Divorces Husband Rinil Raj
प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी केलेलं लग्न; म्हणाली, “माझ्यासाठी हा निर्णय…”

आणखी वाचा : Photos : केवळ ५ कोटींचे बजेट असलेला ‘तुंबाड’ कसा घडला?

विकी आणि कतरिना दोघे शुटींगमध्ये व्यस्त असल्याने कतरिनाला काय वाटतं तेही तिने या मुलाखतीमध्ये सांगितलं, ती म्हणाली, “आम्ही दोघेही कलाकार आहोत आणि एकाच क्षेत्रात असल्याने घरापेक्षा बाहेर आम्ही जास्त वेळ घालवतो, ठिकठिकाणी फिरतो. त्यामुळे मला विकीबरोबर जास्त वेळ घालवायला मिळत नाही, पण तो खरंच खूप समजूतदार आणि चांगला आहे. माझ्या आयुष्यातील त्याचं स्थान हे खूप महत्त्वाचं आहे.”

कतरिना आणि विकी हे गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये लग्नबंधनात अडकले, नुकतंच या दोघांनी कॉफी विथ करणमध्ये हजेरी लावली होती. तेव्हाही या दोघांनी त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल भाष्य केलं होतं. कतरिना सध्या तिच्या ‘फोन भूत’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यामध्ये कतरिनाबरोबर सिद्धांत चतुरवेदि आणि इशान खट्टर आपल्याला दिसणार आहेत. याबरोबरच कतरिना सलमानच्या ‘टायगर ३’मध्येही झळकणार आहे.

Story img Loader