बॉलीवूड विश्वात सध्या दिवाळी पार्टीज सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकार दिवाळी पार्टीचे आयोजन करत आहेत. नुकतीच लोकप्रिय फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राची दिवाळी पार्टी झाली. या पार्टीमध्ये बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थिती राहिले होते. सलमान खानपासून ते ऐश्वर्या राय, रेखा, गौरी खान, सुहान, खुशी कपूर, अनन्या पांडे, वरुण धवन असे बरेच सेलिब्रिटी या पार्टीत सहभागी झाले होते. सध्या या पार्टीतला एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ऐश्वर्या व सलमान एकमेकांना मिठी मारताना दिसत असल्याचं म्हटलं जात आहे. पण या फोटोमागचं नेमकं सत्य काय आहे? जाणून घ्या…

हेही वाचा – “जगबुडी होईल पण ही मालिका…”, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या नव्या प्रोमोवर प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, “भिकेचे डोहाळे…”

nana patekar amitabh bachchan KBC 16
नातवाच्या जन्मानंतर अमिताभ बच्चन मिठाई घेऊन आले अन्…, नाना पाटेकरांनी सांगितला किस्सा; ‘ती’ भेटवस्तू अजूनही ठेवलीये जपून
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
daughter in law hugs mother-in-law tightly
अगंबाई…! सुनबाईंची सासूबाईंना कडकडून मिठी; VIDEO ची एकच चर्चा
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Amitabh Bachchan talks about intercultural marriages in his family
“भावाचं लग्न सिंधी मुलीशी, मुलगी पंजाबी कुटुंबात अन् मुलगा…”; अमिताभ बच्चन यांचे कुटुंबातील सदस्यांच्या लग्नाबाबत वक्तव्य
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन व सलमान खान या दोघांचे लव्ह हेट रिलेशनशिप जगजाहीर आहे. एकेकाळी जीवापाड प्रेम करणारे हे दोघं आता एकमेकांसमोरही येत नाहीत. नुकत्याच पार पडलेल्या मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत दोघं एका छताखाली पाहायला मिळाले. पण ऐश्वर्या या पार्टीतून लवकर निघून गेली. सलमान या पार्टीत असल्यामुळे ऐश्वर्या जास्त वेळ थांबली नाही, असं म्हटलं जात आहे. मात्र बॉलीवूड लाइफच्या वृत्तानुसार, अभिनेत्रीने पार्टीतून लवकर निघायचे हे आधीच ठरवलं होतं. कारण ती एकटीच बच्चन कुटुंबियांकडून पार्टीत सहभागी झाली होती. तसेच तिचे मनिष मल्होत्राबरोबर चांगलं नात आहे. त्यामुळे ती काही वेळासाठी पार्टीत पोहोचली होती. अशातच दुसऱ्याबाजूला सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ऐश्वर्या व सलमान असल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा – Video: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधील लोकप्रिय अभिनेत्याची ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत एंट्री; पाहायला मिळणार महत्त्वाच्या भूमिकेत

एमएस सॅनॉन बी या ट्वीटर (X) अकाऊंटवर हा फोटो शेअर करण्यात आला आहे. ‘सलमान व ऐश्वर्या? काय?’ असं या पोस्टला कॅप्शन देण्यात आलं आहे. त्यामुळे फोटोमध्ये सलमान व ऐश्वर्या मिठी मारताना दिसत असल्याचा तर्क-वितर्क लावले जात आहे. काही नेटकऱ्यांनी संजय लीला भन्साळी यांना ‘हम दिल दे चुके सनम २’ या चित्रपटाची मागणी देखील केली आहे. पण या व्हायरल फोटोमागचं सत्य समोर आलं आहे. या फोटोमध्ये जी मुलगी आहे ती ऐश्वर्या राय नसून सूरज पांचोलीची बहीण सना पांचोली आहे.

हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने गायली श्रेया घोषालने गायलेली अंगाई, कलाकार मंडळीसह चाहत्यांनी केलं कौतुक

दरम्यान, सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, दिवाळीच्या मुहूर्तावर बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत ‘टायगर ३’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जोयाच्या भूमिकेत कतरिना कैफ दिसणार आहे. तसेच इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे.

Story img Loader