बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन नेहमी चर्चेत असते. चित्रपटसृष्टीत ऐश्वर्याचे फारसे मित्र नाहीत. याबाबत ऐश्वर्याने एका मुलाखतीत खुलासा केला आहे. ‘कॉफी विथ करण’मध्ये ऐश्वर्याने चित्रपटसृष्टीत आपले फारसे मित्र का नाहीत यामागचे कारण सांगितले आहे. ऐश्वर्याचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा- ‘द केरळ स्टोरी’ बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवणार? पहिल्या दिवशी किती कमाई करणार? जाणून घ्या
ऐश्वर्या तिचा पती अभिषेक बच्चनसोबत ‘कॉफी विथ करण’मध्ये पोहोचली होती. बॉलीवूडमधील तिच्या मैत्रीबद्दल ऐश्वर्याने मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. ऐश्वर्या म्हणाली, बॉलीवूडमध्ये तिची मुलींपेक्षा मुलांशी जास्त मैत्री आहे. कारण ती इतर अभिनेत्रींप्रमाणे गर्ल टाइप गोष्टी करू शकत नाही. तिला शूज आणि बॅगबद्दल बोलणे आवडत नाही. बाकी मुली नेहमी मेकअप, फॅशन आणि आउटफिट्सबद्दल बोलतात. असे सांगून मला कोणाला अपमानित करायचे नाही पण हा माझा दृष्टिकोण असल्याचे ऐश्वर्या म्हणाली.
हेही वाचा- रणबीर आणि आलियाला ‘यंग स्टार’ म्हणताच भडकली होती कंगना; म्हणालेली “३७ वर्षांचा तो…”
ऐश्वर्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर सोशल मीडियावर लोक भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, बहुतेक व्हिडीओंमध्ये ती तिच्या कुटुंबात व्यस्त दिसत आहे. तर एकाने म्हटले की, आम्ही तिला इतर कोणत्याही अभिनेत्यासोबत चिट-चॅट करताना पाहिले नाही.
हेही वाचा- ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावरून वातावरण तापण्याची शक्यता; प्रदर्शनापूर्वीच ‘या’ राज्यात हाय अलर्ट जारी!
ऐश्वर्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, नुकताच तिचा पोन्नियिन सेल्वन : २ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. केवळ चार दिवसांतच चित्रपटाने २०० कोटींचा गल्ला जमवला होता. या चित्रपटात ऐश्वर्याबरोबर चियान विक्रम, कार्ती, त्रिशा, जयम रवी, ऐश्वर्या लक्ष्मी आणि शोभिता धुलिपाला यांच्यासह आर सरथकुमार, प्रभू, विक्रम प्रभू, जयराम, प्रकाश राज, पार्थिवन, रहमान, लाल यांच्यासह अनेक कलाकार आहेत.