झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून अनेक नवोदित कलाकार मंडळी बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. महानायक, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, शाहरुख खानची लेक सुहाना खान आणि श्रीदेवी यांची दुसरी मुलगी खुशी कपूर ‘द आर्चीज’च्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवत आहेत. काल या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. त्यांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामधील ऐश्वर्या राय-बच्चन आणि अगस्त्य नंदाच्या एका व्हिडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि अगस्त्य नंदाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ऐश्वर्या, अगस्त्य व्यतिरिक्त आराध्या, अभिषेक बच्चन देखील पाहायला मिळत आहे. यामध्ये ऐश्वर्या अगस्त्यची चेष्टा करताना दिसत आहे.

हेही वाचा – सुबोध भावे हिंदी चित्रपटामध्ये का नाही दिसत? अभिनेता कारण सांगत स्पष्टच म्हणाला…

जेव्हा अगस्त्य पापाराझींना फोटोसाठी पोज देत असतो तेव्हा ऐश्वर्या लगेच त्याची चेष्टा करू लागते. अभिनेत्री अगस्त्यला म्हणते, “अगी सोलो पोज. अगी आता तू याची सवय करून घे.” ऐश्वर्या हे हसत-हसत अगस्त्यला बोलताना दिसत आहे. तिचं हे बोलणं ऐकून अभिषेक देखील हसताना पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – रेश्मा शिंदेबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर अखेर अक्षर कोठारीने सोडलं मौनं; अभिनेता म्हणाला, “माझी रेश्मा…”

दरम्यान, ‘द आर्चीज’ चित्रपटात सुहाना, अगस्त्य, खुशी व्यतिरिक्त डॉट, वेदांग रैना, मिहिर आहुजा आणि युवराज मेंडा असे नवोदित कलाकार दिसणार आहेत. ७ डिसेंबरला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची कथा ६०च्या दशकातील प्रेम,मैत्री आणि दु:ख यावर आधारलेली आहे. चित्रपटाचे संपूर्ण कथानक प्रसिद्ध अमेरिकन कॉमिक ‘द आर्चीज’वर आधारित आहे. दिग्दर्शक झोया अख्तरने कॉमिक बुकमधील पात्रांना भारतीय लुक देण्याचा प्रयत्न केला आहे.

Story img Loader