कलाकार मंडळी चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. सतत आपले नवनवीन फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. शिवाय चालू घडामोडींविषयी भाष्य देखील करतात. काही कलाकार नेहमी वर्कआऊटचे व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत असतात. आपल्या चाहत्यांना नियमित वर्कआऊट करण्याचा सल्ला देतात. अशातच एका प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीचा वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आला आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री एका मोठ्या बॉलबरोबर वर्कआऊट करताना दिसत आहे. यावेळी ती बॉलवर उडी मारून तोल सांभाळण्याचा प्रयत्न करत असते. पण बॉलवर उडी मारताच तिचा तोल जातो अन् ती धपकन खाली पडते. खाली मॅट आणि सोबत प्रशिक्षक असल्यामुळे तिला सुदैवाने कुठलीही दुखापत होत आहे. त्यामुळेच ती पडल्यानंतर हसताना पाहायला मिळत आहे. बॉलीवूड अभिनेत्रीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडीओमधली प्रसिद्ध अभिनेत्री कोण?
वर्कआऊट करताना धपकन पडलेली ही अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी अलाया आहे. अलायाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला होता. या व्हिडीओवर तिनं लिहिलं होतं, “आतापर्यंतचे सर्वात वेदनायी अपयश आहे. घरी हे करताना मॅट आणि प्रशिक्षकाशिवाय करू नका.”
दरम्यान, अलायाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अलीकडेच ती ‘बडे मियां छोटे मियां’ आणि ‘श्रीकांत’ चित्रपटात झळकली. या दोन्ही चित्रपटात तिनं साकारलेल्या भूमिकांचं खूप कौतुक करण्यात आलं. सध्या अलायाने कुठल्याही आगामी प्रोजेक्टविषयी जाहीर केलेलं नाही.
हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने ‘या’ मालिकेतील बालकलाकाराच्या कामाचं केलं कौतुक, म्हणाली, “किती समजून…”
२०२०मध्ये अलायाने ‘जवानी जानेमन’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. या चित्रपटात तिच्या सोबतीला अभिनेता सैफ अली खान होता. त्यानंतर ‘फ्रेडी’ चित्रपटात ती नकारात्मक भूमिकेत झळकली. या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यनबरोबर अलाया पाहायला मिळाली.