बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही कायमच प्रसिद्धीझोतात असते. आलिया भट्टने तिच्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकतंच आलियाने तिचा वाढदिवस साजरा केला. याचे काही फोटोही समोर आले आहेत. मात्र नुकतंच आलिया भट्ट ही अभिनेता वरुण धवनवर संतापल्याचे पाहायला मिळत आहे.
आलिया भट्टच्या वाढदिवसानिमित्त अनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या. बॉलिवूडमधील तिचा मित्र-परिवार, कुटुंबातील व्यक्ती यांनी आलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेता वरुण धवननेही इन्स्टाग्रामवर आलियासाठी एक पोस्ट केली. “आलिया तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू आता कुठे ३० वर्षांची झाली आहेस”, असे वरुणने यावेळी म्हटले.
आणखी वाचा : “तो पैशांसाठी गेला…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दिग्दर्शकाने ओंकार भोजनेच्या एक्झिटवर मांडलेले मत
त्याबरोबर वरुणने आलियाचा एक फोटोही शेअर केला आहे. या फोटोत ते दोघेही एका मंचावर मांडी घालून बसल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोवरुनच आलियाही वरुण धवनवर संतापल्याचे दिसत आहे.
आलियाने वरुणच्या या पोस्टवर कमेंट करत त्याला याबद्दल जाबही विचारला आहे. “तू माझा याच्यापेक्षा जास्त चांगला फोटो पोस्ट करु शकला असतास? अशा शब्दात आलियाने वरुणला धारेवर धरलं आहे. आलिया आणि वरुणमध्ये रंगलेले हे संभाषण मजेशीर पद्धतीचे आहे.
आणखी वाचा : “तुझ्यासाठी…” आलिया भट्टच्या वाढदिवसानिमित्त एक्स बॉयफ्रेंडने केलेली पोस्ट चर्चेत
दरम्यान आलिया भट्ट आणि वरुण धवन हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. त्या दोघांनी स्टुंडन्ट ऑफ द इअर या चित्रपटातून एकत्र करिअरला सुरुवात केली. त्यानंतर ते दोघेही कलंक या चित्रपटात एकत्र दिसले. त्यांच्या या ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांनीही उत्तम प्रतिसाद दिला.