बॉलीवूडची अभिनेत्री आलिया भट्टला आतापर्यंत आपण प्रेमकथेवर आधारित असलेल्या चित्रपटांमध्ये जास्त पाहिलं आहे. तसेच तिनं गतवर्षी गंगा हरजीवनदास काठियावाडी यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटात केलेली भूमिका चांगलीच चर्चेत राहिली. पण, आता आलिया ॲक्शन सीन करताना दिसणार आहे. कारण तिनं शाहरुख खान व सलमान खानच्या स्पाय युनिवर्सीमध्ये एंट्री घेतली आहे.

यशराज फिल्मच्या या स्पाय युनिवर्सीच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त गल्ला जमावला आहे. तसेच अनेक रेकॉर्डही ब्रेक केले आहेत. मग तो सलमानचा ‘टायगर’ चित्रपट असो किंवा शाहरुखचा ‘पठाण’. स्पाय युनिवर्सीच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. या युनिवर्सीच्या चित्रपटांमध्ये दीपिका पादुकोण व कतरिना कैफ या दोघींना प्रेक्षकांनी खतरनाक स्टंटबाजी करताना पाहिलं आहे. यामध्ये आता आलियानं एंट्री घेतली आहे. त्यामुळे आलियासुद्धा दीपिका व कतरिनासारखी स्टंटबाजी करताना पाहायला मिळणार आहे.

salman khan did not select in vivah movie
‘विवाह’मध्ये सलमान खानऐवजी शाहिद कपूरला का घेतलं होतं? दिग्दर्शक म्हणाले, “त्या भूमिकेसाठी निरागसपणा…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
aamir khan appreciated ilu ilu 1998 movie and Ajinkya phalke
आमिर खानला ‘या’ नव्या मराठी चित्रपटात काम करण्याची होती इच्छा पण…; अभिनेता मराठीत संवाद साधत म्हणाला…
Urvashi Rautela
उर्वशी रौतेलाने ट्रोल करणाऱ्यांना दिलं उत्तर; म्हणाली, “लोक सलमान खान आणि शाहरूख खानला सोडत नाहीत तर…”
Chhava Movie
‘छावा’मध्ये ‘ती’ वादग्रस्त दृष्ये का घेतली? दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी संगितलं नेमकं कारण
shahid kapoor on where would be geet aditya jab we met (1)
“घटस्फोट झाला असता”, करीना कपूर संदर्भातील ‘त्या’ व्यक्तीच्या वक्तव्यावर शाहिद कपूर म्हणाला, “तिला कोण सहन करेल…”
kajol on indonesian delegants kuch kuch hota hai song
इंडोनेशियन शिष्टमंडळाला ‘कुछ कुछ होता है’ गाण्याची भुरळ, राष्ट्र्रपती भवनात सादर केले शाहरुख-काजोलचे गाणे; अभिनेत्री म्हणाली…
shahid kapoor at screen
Shahid Kapoor Live : ‘जब वी मेट’च्या गीत व आदित्यबद्दल शाहिद कपूरला काय वाटतं? पाहा मुलाखत

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वात मराठमोळ्या व्हिडीओ क्रिएटरची दमदार एंट्री

पिंकविलाच्या वृत्तानुसार, सध्याच्या घडीला आलिया भट्ट ही बॉलीवूडमधली आघाडीची अभिनेत्री आहे. त्यामुळे आता आदित्य चोप्रा आणि त्याच्या टीमनं आलिया भट्टबरोबर एका चित्रपटाची योजना आखली आहे. यामध्ये आलिया प्रमुख भूमिकेत असणार आहे. अशाप्रकारची भूमिका पहिल्यांदाच आलिया साकारणार असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटाचं नाव अजून निश्चित झालेलं नाही, पण २०२४ मध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल.

हेही वाचा – फोटोग्राफरची रस्त्यावर पडलेली चप्पल उचलली अन्… आलियाच्या ‘त्या’ कृतीनं जिंकली नेटकऱ्यांची मनं, व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा – “उंदीर, किडे असलेली डाळ खायचो”; ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्यानं सांगितला तुरुंगातला भयाण अनुभव, म्हणाला…

स्पाय युनिवर्सीनं आतापर्यंत ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’, ‘वॉर’, ‘पठाण’ हे चित्रपट केले आहेत. शिवाय ‘टायगर ३’, ‘वॉर २’ आणि ‘टायगर वर्सेज पठाण’ हे चित्रपट हाती घेतले आहेत. ‘टायगर ३’ चित्रपट येत्या दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे; तर हृतिक रोशनच्या ‘वॉर २’ या चित्रपटाचं शूटिंग नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. तसेच सलमान व शाहरुख आमने-सामने असणारा चित्रपट ‘टायगर वर्सेज पठाण’ पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader