बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टबरोबर एक खळबळजनक प्रकार घडला आहे. आलियाच्या घराच्या समोरच्या इमारतीवरील गच्चीवरुन गुपचूप फोटो काढणाऱ्यांवर तिने संताप व्यक्त केला आहे. यामुळे ती चर्चेत आली आहे. नुकतीच ती पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर आली आहे. मुंबईत चित्रीकरण संपवून येत असताना पत्रकारांनी तिला स्पॉट केले.
आलिया भट्टचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात ती आपल्या गाडीत बसत असताना पापाराझींनी तिच्याकडे फोटोची मागणी केली. यावेळी अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा बबलगम सूट परिधान केला होता. आलिया भट्टने सर्वांना फोटोकाढून दिले तसेच ती खुशदेखील दिसली. नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे. एकाने लिहले आहे, “खूप सुंदर दिसत आहे.” दुसऱ्याने लिहले आहे, “ती खूप चांगल्या मनाची आहे.” मात्र काही जणांनी तिच्यावर टीका केली आहे. “आता स्वतःच आली माध्यमांच्या समोर,” तर आणखीन एकाने लिहले आहे, “आता चांगले बनण्याचे प्रयत्न करत आहे.”
उर्वशी रौतेलाची ‘कांतारा २’ मध्ये एंट्री होणार का? रिषभ शेट्टी म्हणाला…
नेमकं प्रकरण काय?
आलिया भट्ट ही तिच्या लिव्हिंग रुममध्ये बसली होती. त्यावेळी तिला समोरच्या इमारतीवरील गच्चीवरुन दोन जण कॅमेरे घेऊन डोकावत असल्याचं तिला दिसलं. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर तिने हे फोटो पोस्ट करत संबंधित प्रसारमाध्यमासह पापाराझींना जाब विचारला.
आलिया भट्टने ही घटना घडल्यानंतर इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने मुंबई पोलिसांना टॅगही केले होते. यानंतर आता मुंबई पोलिसांनी आलियाच्या या तक्रारीची दखल घेत तिच्याशी संपर्क साधला आहे.