अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे बॉलीवूडचं क्यूट कपल नेहमी चर्चेत असतं. कधी त्यांचे फोटो चर्चेत असताना तर कधी त्यांचे व्हिडीओ व्हायरल होतं असतात. काही दिवसांपूर्वी आलियाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. ज्यामध्ये अभिनेत्रीने तिच्या पतीला म्हणजेच रणबीर कपूरला मेकअप फारसा आवडत नाही. तिने लिपस्टिक लावलेली आवडत नाही, तो पुसायला सांगतो, असं सांगितलं होतं. या व्हिडीओमुळे रणबीरला ‘टॉक्सिक पार्टनर’ बोललं गेलं. यावर आता आलियाने ‘कॉपी विद करण सीझन ८’मध्ये भाष्य केलं आहे.
करण जोहरचा लोकप्रिय शो ‘कॉपी विद करण सीझन ८’मध्ये नुकतीच आलिया भट्ट आणि करीना कपूर सहभागी झाली होती. यावेळी आलिया त्या व्हायरल व्हिडीओविषयी बोलली. अभिनेत्री म्हणाली की, “हे प्रकरणात जास्त पाणी घालून सांगण्यात आलं. हा असा मुद्दा नव्हता, ज्यावर अधिक लक्ष दिलं पाहिजे होतं. यावर अनेक लेख लिहिले गेले. रणबीरला टॉक्सिक आणि दबाव टाकणारा नवरा बोललं जाऊ लागलं. हे खूप जास्त होत होतं, असं माझ्या टीमने सांगितलं. मी म्हणाले, बोलू देत. पण यावेळी अक्षरशः मर्यादा ओलांडली होती. हे प्रकरण उगाच गंभीर बनवलं, जे खऱ्या अर्थी नव्हतं.”
हेही वाचा – “माझ्याकडून शंभर पैकी….”, दिग्दर्शक विजू मानेंची ‘नाळ २’ चित्रपटाविषयी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
पुढे आलिया म्हणाली की, “सर्वात मोठा मुद्दा असा आहे की, काही गोष्टी संदर्भाबाहेर बोलल्या जात होत्या. पण रणबीर नेहमी मला सांगतो की, आलिया प्रेक्षक आपला मालक आहे. जोपर्यंत तुमचे चित्रपट चांगले चालत आहेत तोपर्यंत ते तुमच्याबद्दल त्यांना जे हवं ते बोलू शकतात.”
दरम्यान, आलिया-रणबीरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच अभिनेत्री ‘जिगरा’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. तसेच रणबीरचा ‘अॅनिमल’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तो दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानाबरोबर पाहायला मिळणार आहे. तसेच आलिया आणि रणबीर पुन्हा एकदा एकत्र ‘ब्रह्मास्त्र २’ मध्ये झळकणार आहे.