बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री आलिया भट्टचा ‘जिगरा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. हिंदी आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित झालेल्या आलियाच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटात वेदांग रैना महत्त्वाच्या भूमिकेत आहे. भाऊ-बहिणीच्या कथेवर आधारित असलेल्या आलियाच्या ‘जिगरा’ चित्रपटाने चार दिवसांत १८ कोंटीची कमाई केली आहे. त्यामुळे सध्या आलियाची जोरदार चर्चा सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकीकडे आलिया भट्टची चर्चा होत असली तरी दुसरी नेहमी तिची लाडकी लेक राहा खूप चर्चेत असते. आलिया आणि रणबीरच्या लेकीने तिच्या गोंडसपणाने अनेकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळेच राहा कपूरचे सातत्याने नवनवीन व्हिडीओ व्हायरल होतं असतात. नुकतंच आलियाने राहाच्या बाबतीत एक खुलासा केला; ज्याची सध्या चर्चा होतं आहे.

हेही वाचा – अभिनेता शशांक केतकरच्या लाडक्या लेकाला पाहिलंत का? सेल्फी होतोय व्हायरल

आलिया भट्टची नणंद करीना कपूर खानचा ‘व्हॉट वूमन वॉन्ट’च्या पाचव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली. या पाचव्या पर्वात पहिलीच पाहुणी आलिया उपस्थित राहिली होती. यावेळी आलियाने राहा आणि रणबीरविषयी बरंच काही सांगितलं. आलिया म्हणाली, “कधीकधी राहा रणबीरला ‘पापा भट्ट’ आणि मला ‘आलिया कपूर’ म्हणते.”

काही दिवसांपूर्वी आलियाने राहाला ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू-नाटू’ गाणं खूप आवडत असल्याचं सांगितलं होतं. एवढंच नव्हेतर राहा सतत तिला ‘नाटू-नाटू’ गाणं लावून नाचायला सांगते. एका पुरस्कार सोहळ्यात आलियाने या गाण्यावर केलेला डान्स व्हिडीओ राहा सतत पाहते, असं अभिनेत्रीने सांगितलं होतं.

हेही वाचा – Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्ते अचानक ‘बिग बॉस १८’च्या घराबाहेर? नेमकं काय घडलं, जाणून घ्या

हेही वाचा – Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंनी सांगितली त्यांच्या ‘प्रेमाची गोष्ट’, जोरजोरात ओरडत म्हणाले, “जयश्री आय लव्ह यू”

दरम्यान, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर २०२२ मध्ये लग्न झालं. त्यानंतर त्याचवर्षी ६ नोव्हेंबरला आलियाने राहाला जन्म दिला होता. दोघांनी एक वर्ष राहाचा चेहरा लपवला. गेल्या वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर आलिया आणि रणबीरने राहाची पहिली झलक दाखवली. तेव्हापासून राहाचे गोड व्हिडीओ नेहमी व्हायरल होतं असतात.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress alia bhatt reveals adorable anecdotes about daughter raha calling ranbir kapoor pps