अभिनेत्री आलिया भट्ट आणि तिची लेक राहा नेहमी चर्चेत असतात. मायलेकीचे व्हिडीओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. पण यादरम्यान आलिया कधीच राहाचा चेहरा दाखवतं नाही. अशातच आलियाने काल (१७ डिसेंबर) चाहत्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी तिच्या चाहत्यांनी प्रश्नांचा भडीमार केला. पण आलियाने चाहत्यांच्या मोजक्या प्रश्नांची उत्तर दिली. यावेळी तिला तिच्या लेकीसंदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले.
अभिनेत्री आलिया भट्टने इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी सेशन’द्वारे चाहत्यांशी गप्पा मारल्या. ज्यामध्ये चाहत्यांनी त्वचेच्या काळजीपासून ते राहापर्यंत अनेक प्रश्न विचारले. यावेळी एका चाहत्याने विचारले की, तुला अजूनही राहापासून जास्त वेळ वेगळं राहिल्यावर चिंता वाटते का? या प्रश्नाचं उत्तर देत आलिया म्हणाली, “राहापासून लांब राहणं हे माझ्यासाठी सोप नसतं. जेव्हा मी बाहेर असते तेव्हा मला जास्त चिंता किंवा काळजी करायची गरज नसते. कारण राहा आपल्या कुटुंबीयांबरोबर सुरक्षित आहे, हे मला माहित असतं.”
हेही वाचा – “रणबीरला पहिल्यांदा भेटलो तेव्हा…” उपेंद्र लिमयेंनी सांगितला किस्सा; म्हणाले, “अहंकार…”
तसेच आणखी एका चाहत्याने राहाच्या टोपणं नावाविषयी विचारले. तेव्हा आलिया म्हणाली, “मी राहाला राहू, रारा आणि लॉलीपॉप या टोपणं नावांनी हाक मारते.”
दरम्यान, आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सध्या ती ‘जिगरा’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटात आलिया फक्त प्रमुख भूमिकेत नाही तर धर्मा प्रोडक्शनबरोबर निर्मितीचे देखील काम करतेय. ‘जिगरा’ या चित्रपटात आलियाबरोबर शोभिता धुलिपाला देखील पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट २७ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.