बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे, कधी सोशल मीडियावरील वक्तव्यामुळे, तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे हे कलाकार कायम चर्चेत असतात. महत्त्वाचे म्हणजे या कलाकारांबरोबरच त्यांच्या मुलांविषयीदेखील चाहत्यांना उत्सुकता असते. बॉलीवूडमधील आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लाडके जोडपेदेखील आपल्या चित्रपटांशिवाय मुलगी ‘राहा’मुळे मोठ्या चर्चेत असते. आलियाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आई म्हणून ती आपली भूमिका कशी निभावते याबद्दल वक्तव्य केले आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत आलियाने म्हटले आहे की, जेव्हा मी एक अभिनेत्री आणि आईच्या भूमिकेत असते तेव्हा मी कोणतीही गणती करत नाही. आई म्हणून मी ज्या गोष्टी करते किंवा राहासाठी गोष्टी निवडते तेव्हा तिच्यासाठी काय योग्य आहे याचा विचार करुन निवडते. पुढे बोलताना अभिनेत्री म्हणते, “मला वाटते की, माझ्या मुलीने स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करावे. राहा जशी मोठी होईल तसे तिने तिचे म्हणून वेगळे व्यक्तिमत्त्व निर्माण केले पाहिजे.” आलिया म्हणते, “माझा विश्वास आहे की, प्रत्येक मूल त्याचे वेगळे व्यक्तिमत्त्व निर्माण करते. तुम्ही त्यांचा सांभाळ करू शकता, त्यांची काळजी घेऊ शकता. पण, त्यांना त्यांचे अस्तित्व शोधता आले पाहिजे. मला वाटते की, राहाने असे काहीही करू नये, निवडू नये; ज्यामध्ये तिला अवघडल्यासारखे होईल. ती जे काही निवडेल, त्यामध्ये तिला सहज वाटले पाहिजे.”

Writer Director producer Actor Sumit Patil Vishay Hard film Released
प्रेमाचा खुसखुशीत विषय
Manisha Koirala exploited in romantic relationships
“मी नेहमी चुकीच्या पुरुषांच्या प्रेमात पडले,” मनीषा कोईरालाचे वक्तव्य; जोडीदाराबद्दल अपेक्षा सांगत म्हणाली, “मला असं नातं…”
Nana Patekar
“मी साधा, सभ्य काश्मिरी मुलगा होतो; पण नाना पाटेकरांमुळे…”, विधू विनोद चोप्रांचे वक्तव्य चर्चेत
Shabana Azmi And Javed Akhtar
“सगळीकडे त्याच्या दारुचा….”, शबाना आझमींनी सांगितला पती जावेद अख्तर यांचा ‘तो’ किस्सा
Premachi Goshta Fame Komal Gajmal and Ira parwade dance on Jhalla Wallah song Of Ishaqzaade movie
Video: ‘प्रेमाची गोष्ट’मधील स्वातीचा चिमुकल्या सईबरोबर श्रेया घोषालच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, नेटकरी म्हणाले, “आत्या आणि भाची…”
Nawazuddin Siddiqui
“भांग प्यायल्यावर मला…”, नवाजुद्दीन सिद्दिकीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, “त्या गोष्टींना प्रोत्साहन देऊ इच्छित नाही; पण…”
tanushree dutta reply nana patekar
नाना पाटेकरांनी ‘त्या’ आरोपांवर प्रतिक्रिया देताच तनुश्री दत्ता म्हणाली, “आता ते घाबरले आहेत, कारण त्यांचे…”
Fathers Day 2024 Wishes Quotes Messages in Marathi
Happy Father’s Day Wishes: ‘फादर्स डे’ची तारीख काय? ४ ओळीत बाबा खुश होतील अशा ‘या’ शुभेच्छा आजच सेव्ह करून ठेवा

हेही वाचा : “आम्ही अक्षरशः रस्त्यावर राहायचो, मग गोठा, पत्र्याचं घर…”, अखेर रुपाली भोसलेचं स्वप्न झालं पूर्ण! दाखवली नव्या घराची झलक

चित्रपटांच्या निवडीबाबत बोलताना आलिया भट्ट म्हणते की, ज्या चित्रपटांची मी निर्मिती केली आहे किंवा जे चित्रपट मी निवडले आहेत, त्यामध्ये गोष्ट असते. महिला सक्षमीकरण, कौटुंबिक मूल्ये किंवा असे काहीतरी; ज्यामध्ये दयाभाव, प्रेम व सुरक्षा असते आणि अशा गोष्टींना माझ्या लेखी फार महत्त्व आहे. काही वेळा मी असेही चित्रपट निवडते; ज्यामध्ये असणाऱ्या मूल्यांकडे मी स्वाभाविकपणे आकर्षित होते. मी अनेकदा असेही चित्रपट निवडले आहेत; जे मला समजत नाहीत इतके ते अद्भुत होते. त्यामुळे मी कशाचीही गणती करीत नाही. आलियाने असेही म्हटले आहे की, जेव्हा जेव्हा शाहरुख खानचे नाव घेतले जाते तेव्हा तेव्हा तुम्ही प्रेमाविषयी विचार करता आणि तुमच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होतो. तसेच या भावनेची गणती होऊ शकत नाही. मला माहीत नाही की, मी काय वारसा ठेवून जाणार आहे. पण मला असे वाटते की, जेव्हा लोक माझ्याबद्दल विचार करतील तेव्हा त्यांना काहीतरी जाणवले पाहिजे.

आलिया भट्टच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच ‘जिगरा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.