बॉलिवूडमध्ये सध्या एकच अभिनेत्रीची चर्चा आहे ती म्हणजे आलिया भट, ‘स्टुडंट ऑफ द इअर’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सुरवातीला अनेकांनी ट्रोल केले. मात्र आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने आपले स्थान निर्माण केले आहे. नुकताच तिचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे ती लवकरच आई होणार आहे. नुकतीच तिने आपल्या आईसाठी भावुक पोस्ट शेअर केली आहे.
आलिया भटची आई सोनी राझदान यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने आलियाने एक पोस्ट शेअर केली आहे. ती असं म्हणाली आहे ‘सर्वात अविश्वसनीय व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझे सर्वात सुरक्षित ठिकाण. इतर कोणत्याही वर्षापेक्षा मला यावर्षी जास्त जाणवले की तुझा आत्मा सुंदर आहे, तू आपल्या कुटुंबासाठी खूप काही केले आहेस’. अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दिवाळीच्या शुभेच्छा देत श्रेया घोषालने गायले ‘या’ सुपरहिट मराठी चित्रपटातील गाणे; व्हिडीओ व्हायरल
सोनी राझदान या महेश भट यांची दुसरी बायको, त्यांच्या ‘सारांश’ चित्रपटात सोनी यांनी काम केले होते. दोघांचे सूट जुळले आणि महेश भट यांनी सोनी राझदान यांच्याशी विवाह केला. महेश यांनी सोनीशी लग्न करण्यासाठी मुस्लीम धर्म स्वीकारला होता. महेश आणि सोनी राजदान यांना आलिया आणि शाहीन भट्ट या दोन मुली आहेत.
‘कपूर अँड सन्स’, ‘डिअर जिंदगी’, गंगुबाईसारखे हिट चित्रपट आलियाच्या नावावर आहेत. नुकताच येऊन गेलेल्या ब्रह्मास्त्र चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमी केली होती. अभिनेता रणबीर कापूरबरोबर तिने पहिल्यांदाच काम केले होते. प्रेक्षकांनीदेखील या जोडीला पसंत केले आहे