अभिनेत्री आलिया भट्टने नोव्हेंबर महिन्यात मुलीला जन्म दिला. अलीकडेच आलियाने तिच्यामध्ये मातृत्वानंतर झालेल्या बदलांबाबत भाष्य केलंय. आई झाल्यानंतर अभिनेत्री म्हणून भूमिकेकडे पाहण्याचा दृष्टीकोन कमालीचा बदलला आहे, असं आलियाने म्हटलंय. मातृत्वाने आपल्याला खूप बदलून टाकलं आहे. मुलीच्या जन्मांनंतर ती पूर्वीसारखी सोशल मीडियावर सक्रीय नसली तरी तिने एक नुकताच फोटो शेअर केला आहे.
आलिया भट्ट सोशल मीडियावर आपले फोटोशूट शेअर करत असते. तिच्या फोटोंना नेटकाऱ्यांची पसंती मिळत असते. भव्यदिव्य स्टुडिओ अथवा चित्रपटाच्या सेटवरील फोटो ती शेअर करत असते यावेळी मात्र फोटोसाठी तिला हटके जागा मिळाली आहे. तिने आपल्या बाथरूममध्ये सेल्फी काढत कॅप्शन दिला आहे रविवारच्या सकाळी चांगला प्रकाश शोधत आहे आणि काही कारण नसताना बाथरूममध्ये फोटोशूट करत आहे, अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
प्रसिद्ध यूट्यूबरच्या दोन्ही बायका एकाच वेळी प्रेग्नंट; सोशल मीडियावर उठली टीकेची झोड
आलियाच्या फोटोवर मजेशीर कमेंट येत आहेत. तिची आई सोनी राझदान यांनी ‘हाहाहा’ अशी कमेंट केली आहे. सूर्यप्रकाशात उजळून दिसत आहेस असं एकाने लिहले आहे. तर एकाने छान असे लिहले आहे. ‘सुंदर’, ‘अप्रतिम’ अशा कमेंट फोटोवर केल्या आहेत. अश्वगंधाचा वास कसा घेऊ? अशी टिप्पणी केली आहे
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट १४ एप्रिल रोजी विवाहबंधनात अडकले होते. त्यानंतर २ महिन्यांनी त्यांनी आई-बाबा होणार असल्याची घोषणा केली होती. दोघांच्याही घरी ६ नोव्हेंबर रोजी चिमुकल्या परीचं आगमन झालं. आलिया आता लवकरच एका हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे.