अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरची लेक राहा आता एक वर्षांची झाली आहे. तिचा आज पहिला वाढदिवस आहे. याचनिमित्ताने आलियाने लेकीच्या पहिला वाढदिवसाच्या सेलिब्रिशनमधील काही खास क्षणाचे फोटो सोशल मीडियावर नुकतेच शेअर केले आहेत; जे चांगलेच चर्चेत आले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आलिया व रणबीर हे बॉलीवूडमधील क्यूट कपलपैकी एक आहे. गेल्यावर्षी ६ नोव्हेंबरमध्ये दोघं आई-बाबा झाले. आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला, जिचं नाव राहा असं आहे. आज राहाला एक वर्ष पूर्ण झाले आहेत. तरीही अजूनपर्यंत आलिया व रणबीरने राहाचा चेहरा उघड केलेला नाही. त्यामुळे चाहत्यांना राहाची पहिली झलक तिच्या वाढदिवसाच्या दिवशी होईल, अशी अपेक्षा होती. पण आजही आलियाने लेकीचा चेहरा न उघड करता तिचे फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये राहाचा फक्त हात दिसत आहे. पहिल्या फोटोमध्ये राहा केकबरोबर खेळताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये राहा, रणबीर आणि आलियाने हातात फुल घेतलेलं पाहायला मिळत आहे. तसेच तिसऱ्या पोस्टमध्ये म्युझिक बॉसवर ‘ला वी एन रोज’ या फ्रेंच गाण्याचं म्युझिक वाजताना ऐकू येत आहे.
हेही वाचा – “एक बाईने अथांगला अचानक मागून…”, उर्मिला निंबाळकरने सांगितला लेकाबरोबर घडलेला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…
आलियाने ही पोस्ट शेअर करत लिहीलं आहे, “आमचा आनंद…आमचं आयुष्य…आमचा उजेड…कालच आम्ही हे गाणं तुझ्यासाठी वाजवत होतो, जेव्हा तू माझ्या पोटात लाथा मारत होतीस…मी अजून काही सांगू शकत नाही, पण एवढं म्हणते की, आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो कारण तू आमच्या आयुष्यात आहेस. तू प्रत्येक दिवस एखाद्या क्रिमी, चविष्ट, सुंदर केकच्या तुकड्याप्रमाणे बनवतेस…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा छोटी वाघीण…आम्ही तुझ्यावर प्रेमापेक्षा ही जास्त प्रेम करतो…”
दरम्यान, आलिया-रणबीरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, लवकरच आलिया ‘जिगरा’ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. तसेच रणबीरचा ‘अॅनिमल’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तो दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानाबरोबर पाहायला मिळणार आहे. तसेच आलिया व रणबीर पुन्हा एकदा एकत्र ‘ब्रह्मास्त्र २’ मध्ये झळकणार आहे.