करण जोहर दिग्दर्शित आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट प्रमुख भूमिका साकारणार आहेत. सध्या दोघेही चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. नुकतीच दोघांनी मनीष मल्होत्राच्या रॅम्प वॉक शोमध्ये हजेरी लावली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “आईने माणूस म्हणून अन् रंगभूमीने…”, प्रसिद्ध अभिनेत्याने केलं मराठी नाटकांचं कौतुक; म्हणाला, “सगळे रेकॉर्ड्स…”

मनीष मल्होत्राच्या ‘ब्रायडल कॉउचर शो’मधील रॅम्प वॉकचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. यामध्ये रणवीर सिंहचा आत्मविश्वास पाहून सर्वांनी त्याचे कौतुक केले मात्र, आलिया भट्टला तिने परिधान केलेल्या मोठ्या भरजरी लेहेंग्यामुळे ट्रोल केले जात आहे.

हेही वाचा : मराठा सैन्याची शौर्यगाथा लवकरच मोठ्या पडद्यावर! ‘फौज’ चित्रपटाची घोषणा, पोस्टरने वेधले लक्ष

मनीष मल्होत्राच्या शोमध्ये, रणवीर सिंह पांढऱ्या आणि क्रीम रंगाच्या शेरवानीमध्ये दिसला, तर आलिया भट्टने राखाडी आणि सिल्व्हर रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. वॉक दरम्यान दोघांनीही कॅमेरासमोर पोज दिल्या परंतु, आलिया भट्ट ड्रेस सावरत, अतिशय काळजीपूर्वक चालताना दिसली. चेहऱ्यावरील हास्य टिकवून ठेवण्याचा आलियाने सर्वतोपरी प्रयत्न केला पण, नेटकऱ्यांना आलियाची अस्वस्थता अखेर या व्हायरल व्हिडीओमधून लक्षात आली. हा व्हिडीओ पापाराझी इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा : प्राजक्ता गायकवाडने दिली गुडन्यूज, पदवी परीक्षेत मिळाले इतके गुण

आलिया भट्टचे रॅम्प वॉक करतानाचे व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी अभिनेत्री ट्रोल केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “आलियाचा लूक आणि रॅम्पवरच्या ढासळलेल्या आत्मविश्वासाबद्दल काय बोलावे… ” दुसऱ्या युजरने “ती तिच्या कपड्यांमध्ये अजिबात कम्फर्टेबल दिसत नाहीये, आलियाचा वॉक करतानाचा संघर्ष थेट दिसत आहे.”, असे म्हटले आहे. काही नेटकऱ्यांनी आलियाने दीपिका पदुकोणची कॉपी केल्याचे म्हटले आहे. याउलट दुसरीकडे रणवीरचे सर्वांनी कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा : “महिलांचा एवढा अपमान…” मणिपूर घटनेवर जया बच्चन संतापल्या, म्हणाल्या, “तो व्हिडीओ…”

दरम्यान, आलिया भट्ट आणि रणवीर सिंहचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट २८ जुलैला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आलिया-रणवीर यांच्याशिवाय या चित्रपटात दिग्गज अभिनेत्री जया बच्चन, अभिनेते धर्मेंद्र, शबाना आझमी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.