बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणून आलिया भट्टकडे पहिले जाते. मागचं वर्ष तिच्यासाठी लकी ठरलं होतं एकीकडे ती विवाह बंधनात अडकली तसेच तिला कन्यारत्नाचा लाभ झाला तर दुसरीकडे तिचा सुपरहिट ब्रह्मास्त्र चित्रपट सुपरहिट ठरला. तिच्या पतीबरोबर म्हणजे रणबीर कपूरबरोबर ती पहिल्यांदा झळकली होती. आलिया भट्टची माध्यमांमध्ये कायमच चर्चा असते. अनेकदा पापाराझी तिला जिम बाहेर अथवा घराबाहेर गाठून तिचे फोटो काढत असतात. मात्र एक माध्यमाच्या फोटोग्राफरने तिचे फोटो काढल्याने तिने संतापजनक पोस्ट शेअर केली आहे.

आलिया भट्ट सोशल मीडियावर सक्रीय असते. आलिया भट्टचे तिच्या घरातील काही खासगी फोटो एका माध्यमातील फोटोग्राफरने काढून पोस्ट केले. यावरच आलिया भट्टने इन्स्टावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. ती स्वतःचा फोटो शेअर करत म्हणाली, “तुम्ही माझी मस्करी करत आहात का? मी माझ्या घरात दुपारच्यावेळी माझ्या लिव्हिंग रूममध्ये बसले होते. तेव्हा मला काहीतरी माझ्याकडे पाहत आहे असे वाटले.. मी वर पाहिले आणि माझ्या शेजारच्या इमारतीच्या टेरेसवर दोन माणसे माझ्याकडे कॅमेरा घेऊन दिसली. कोणत्या जगात हे योग्य आहे अथवा याला परवानगी आहे? एखाद्याच्या खासगी आयुष्याचे उल्लंघन करण्यासारखे आहे. एखादी रेषा असते जी तुम्ही ओलांडू शकत नाही मात्र आज तुम्ही ती रेषा पार केली आहेत. “अशा शब्दात तिने प्रतिक्रिया दिली असून मुंबई पोलीसांना टॅग केले आहे.

Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Saif Ali Khan Attacked News
“मध्यरात्री २.३० वाजता…”, सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यावर जवळच्या व्यक्तीचा खुलासा, सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
Neena Gupta aunt threw her out after daughter Masaba birth
लग्न न करता झालेली आई, एकदा काकूने अचानक मध्यरात्री…; बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली…

उदय चोप्राबरोबरच्या किसिंग सीनमुळे शमिता शेट्टीला सहन करावा लागला होता ‘हा’ त्रास; म्हणाली “मी पुन्हा…”

तिच्या या पोस्टवर आता सेलिब्रेटी व्यक्त होऊ लागले आहेत. अभिनेता अर्जुन कपूरने पोस्ट शेअर केली आहे तो असं म्हणाला, “हे खूप लज्जास्पद आहे. आज हद्द पार केली आहे. महिला आता त्यांच्या घरात ही सुरक्षित नाहीत मग ती महिला सामान्य असो किंवा समाजातील प्रतिष्ठित महिला. एखादा समजूतदार माणूस जेव्हा आपल्या गरजेसाठी प्रसिद्ध व्यक्तीचे फोटो काढतो हे कीव येण्याजोगे आहे. आणि ज्या माध्यमांवर आम्ही विश्वास ठेवतो त्यांना वाटते ते त्यांचे काम करत आहे पण असे नाही तुम्ही महिलांना असुरक्षित करत आहात. हे म्हणजे एखाद्याचा पाठलाग करण्यासारखे आहे.” अशा शब्दात त्याने प्रतिक्रिया दिली आहे. तर स्वरा भास्करन म्हणाली, “आलिया भट्ट तू बरोबर आहेस हे खूपच त्रासदायक आहे.”

दरम्यान आलियाने आता राहाच्या जन्मानंतर पुन्हा एकदा चित्रपटाच्या तयारीला सुरुवात केली आहे. ती करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटातूनही यावर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. याचबरोबर फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात आलिया कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Story img Loader