बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत या नुकत्याच हिमाचल प्रदेशातील मंडी येथून खासदार झाल्या. निवडणुकांचा प्रचार व निकालानंतर आता कंगना कुटुंबाबरोबर वेळ घालवताना दिसत आहेत. कंगना या त्यांच्या कुटुंबासोबत आपल्या चुलत भावाच्या घरी आहेत. कंगना यांचा भाऊ वरुण रणौतचं नुकतंच लग्न झालं. आता ‘क्वीन’ने नवविवाहित जोडप्याला चंदीगडमध्ये एक सुंदर घर भेट म्हणून दिलं आहे.
वरुण रणौतने इन्स्टाग्रामवर या घराचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कंगना रणौत व त्यांचे कुटुंबीयही दिसत आहेत. वरुण रणौतचं नुकतंच सीमाशी लग्न झालं. त्याच्या लग्नासाठी रणौत कुटुंबीय एकत्र जमले होते. यावेळी सर्वांनी कंगना यांनी वरुण व सीमाला दिलेल्या घरात वेळ घालवला. वरुणने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये त्यांचे कुटुंबीय खूप आनंदी दिसत आहेत.
सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालची बॅचलर पार्टी! लग्नाआधी दोघांनी मित्रांसह केलं एंजॉय, पाहा खास Photos
कंगना रणौत यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यांनी चुलत भाऊ वरुण राणौत आणि त्याची पत्नी सीमा यांना चंदीगढमध्ये एक सुंदर घर भेट दिले आहे. पहिल्या फोटोत वरुणने लिहिलेला सुंदर मेसेज पाहायला मिळतो. ‘दीदी या अनमोल भेटीबद्दल धन्यवाद… आता चंदीगढमध्ये घर आहे,’ असं त्याने लिहिलं होतं. यानंतर कंगना यांनी या नव्या घरातील काही फोटो पोस्ट केले आहेत.
वरुण राणौतने त्याच्या इन्स्टा हँडलवर पत्नी सीमाबरोबरचे लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ते दोघेही जवळच्या लोकांच्या उपस्थितीत काही विधी करताना दिसत आहेत. कंगना रणौत या सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. “जवळच्या लोकांबरोबर नवीन घरात नवीन सुरुवात. कंगना रणौत तुमच्या येण्याने घराची आणि कार्यक्रमाची शान वाढली आहे. इतके सुंदर घर, तुमचे प्रेमे आणि आशीर्वादांसाठी खूप खूप धन्यवाद. वरुण आणि सीमा”, असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिलं आहे.
दरम्यान, कंगना रणौत यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्या लवकरच स्वतः दिग्दर्शित केलेल्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात कंगना राणौत यांनी माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अनुपम खेर, श्रेयस तळपदे, विशाल नायर आणि महिमा चौधरी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सध्या चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर होण्याची वाट पाहत आहेत.