एक काळ असा होता जेव्हा झगमगत्या विश्वात सर्वत्र फक्त अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री मनिषा कोईराला यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला होता. दोघांना अनेक ठिकाणी स्पॉटदेखील करण्यात आलं होतं. दोघांनी ‘अग्निसाक्षी’ चित्रपटात एकत्र काम केलं. मग ‘खामोशी’ चित्रपटातही दोघे एकत्र दिसले. या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यानच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले असल्याच्या चर्चा तेव्हा झाल्या. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. यासाठी आयशा जुल्का (ayesha jhulka) कारणीभूत असल्याचेही म्हटलं गेलं.

आमिर खानच्या ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटातून आयशा प्रसिद्धीझोतात आली. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारी आयशा वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिली आहे. अशातच तिने नुकत्याच एका मुलाखतीत नाना पाटेकर, मिथुन चक्रवर्ती आणि अक्षय कुमार यांच्याबरोबरच्या संबंधांच्या वृत्तांवर भाष्य केलं आहे. ९० च्या दशकात आयशा जुल्काचे नाव या सर्व कलाकारांशी जोडले गेले होते. असं म्हटलं जात होतं की, मनीषा कोईरालाने नाना पाटेकरांबरोबर ब्रेकअप केले याचे कारणही आयशा जुल्का होती.

पण ते खरोखरच असे होते का? याबद्दल स्वत: आयशा जुल्काने भाष्य केलं आहे. आयशाने विकी लालवानी यांना दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं की, “त्यावेळी माझे नाव सर्वांशी जोडले गेले होते. पण आम्ही फक्त मित्र होतो आणि आमचे चांगले संबंध होते. जेव्हा तुम्ही ६-७ चित्रपट एकत्र करता आणि तुम्ही दर तिसऱ्या दिवशी सेटवर एकमेकांना भेटत होतो. त्या त्या वयातला तो भोळेपणा आहे.”

अभिनेत्री आयशा जुल्का
अभिनेत्री आयशा जुल्का

आयशा जुल्का पुढे म्हणाली की, “आजही माझे मैत्रीणींपेक्षा जास्त मित्र आहेत. पण याचा अर्थ असा नाही की, तुम्हाला त्यांच्याशी प्रेमसंबंधात अडकावे लागेल. आजच्या काळात लपवण्यासारखे काय आहे? आम्ही ते वय ओलांडले आहे. आजकाल लिव्ह-इन रिलेशनशिप आणि लव्ह मॅरेज खूप सामान्य आहेत आणि अशा गोष्टींवर चर्चा करणे म्हणजे ‘प्राचीन’ वाटते.”

यानंतर आयशाने मिथुन चक्रवर्ती आणि नाना पाटेकर यांच्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध असल्याचे नाकारले. याबद्दल ती “हे हास्यास्पद आहे” असं म्हणाली. “त्याचा प्रेमसंबंधाशी काहीही संबंध नव्हता. आम्ही एकत्र फोटोशूट केले आणि नंतर मी त्याच्याबरोबर एक नाटक केले. पण पुन्हा आमच्या वयातली ज्येष्ठता पाहा. मला माझ्या वयाच्या सहकलाकारांबरोबर नांव जोडले जाणे समजतं; पण मला माझ्यापेक्षा मोठ्या लोकांबद्दल बोलणं आवडत नाही. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही.”

नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला
नाना पाटेकर आणि मनीषा कोईराला

यापुढे अभिनेत्रीने अक्षय कुमारबरोबरच्या नात्याबद्दलही भाष्य केलं. आयशाने अक्षयबद्दलच्या अफवा खऱ्या आहेत की नाही याबद्दल तपशीलवार सांगितले नाही. परंतू त्यांच्यात शारीरिक आकर्षण असल्याचे तिने कबूल केले. याबद्दल आयशा म्हणाली की, “आकर्षण असू शकते, पण ते सामान्य आहे. आम्हाला एकमेकांबद्दल आकर्षण वाटलं होतं, पण मला वाटत नाही की ‘शारीरिक आकर्षण’ सांगण्याचा हा योग्य मार्ग आहे.”