बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हिला डेंग्यूची लागण झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याचं समोर आलं आहे. याबाबतची माहिती भूमीने स्वतः सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली आहे. तसेच अभिनेत्रीने चाहत्यांना डासांपासून सावध राहण्याचं आवाहन देखील केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री भूमी पेडणेकरने काही तासांपूर्वी स्वतःचे सेल्फी सोशल मीडियावर शेअर करत डेंग्यूची लागण झाल्याची माहिती दिली. या सेल्फीमध्ये भूमी हॉस्पिटलच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. हे फोटो शेअर करत अभिनेत्रीने लिहिल आहे, “एका डेंग्यूच्या डासाने मला ८ दिवस प्रचंड वेदना दिल्या. पण आज जेव्हा मी उठले तेव्हा मला बरं वाटलं अन् मग मी एक सेल्फी काढला.”

हेही वाचा – Video: सलमान खानने भरगर्दीत महिलेला केलं किस; व्हायरल व्हिडीओमधील ‘ती’ महिला कोण?

पुढे अभिनेत्री चाहत्यांना आवाहन करत म्हणाली, “मित्रांनो सावध राहा, कारण गेले काही दिवस माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण गेले. सध्या डासांपासून सुरक्षित राहण्याची खूप गरज आहे. तुमच्या प्रतिकारशक्तीची काळजी घ्या. माझ्या ओळखीतल्या अनेक जणांना डेंग्यू झाला आहे. हा एक अदृश्य व्हायरस आहे, ज्यामुळे प्रकृती बिघडते. माझी चांगली काळजी घेतल्याबद्दल डॉक्टरांचे आभार. तसेच नर्स, सफाई कर्मचारी यांचे देखील खूप खूप आभार.”

हेही वाचा – “माझे डोळे सतत भरून येत होते…” अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने कोल्हापुरच्या महालक्ष्मी मंदिरातला सांगितला अनुभव, म्हणाला…

दरम्यान, भूमी पेडणेकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ऑक्टोबर महिन्यात तिचा ‘थँक्यू फॉर कमिंग’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. याशिवाय ‘द लेडी किल्लर’ या चित्रपटात ती झळकली होती. पण भूमीचे हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress bhumi pednekar is suffering from dengue she hospitalized for last eight days pps