बॉलिवूडमधील नवं जोडपं म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा -कियारा अडवाणी, या दोघांचा नुकताच शाही विवाह सोहळा राजस्थानमध्ये पार पडला. मात्र त्यांनी काल रविवारी मुंबईत रिसेप्शन ठेवले होते. संपूर्ण बॉलिवूडने या रिसेप्शनला हजेरी लावली. रोहित शेट्टी, अलिया भट्ट, अजय देवगण, काजोल, अंबानी दाम्पत्य, अभिषेक बच्चन, आशुतोष गोवारीकर अशा कित्येक मंडळींनी हजेरी लावून नव्या जोडप्याला शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री भूमी पेडणेकरदेखील या रिसेप्शनला हजर होती.
अभिनेत्री भूमी पेडणेकर ही बॉलिवूडमधील एक बेधडक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती नेहमी तिला समाजातल्या खटकणाऱ्या गोष्टींवर भाष्य करताना दिसते. तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळेही ती बऱ्याचदा चर्चेत येत असते. रिस्पेशनमध्ये तिने परिधान केलेल्या ड्रेसमुळे सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जात आहे. तिने डीप नेक ब्लाउज आणि घागरा परिधान केला होता.
तिच्या या कपड्यांमुळे ती पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. एकाने लिहले आहे, “तिने परिधान केलेल्या कपड्यांमध्ये ती खूपच विचित्र दिसत आहे.” दुसऱ्याने लिहले आहे, “काहीतरी वेगळं घालत जा,” आणखीन एकाने लिहले आहे “उर्फीच्या वाटेवर चालली ही,” एकाने लिहले आहे “तिने परिधान केलेल्या कपड्यांमध्ये ती स्वतः कम्फरटेबल दिसत नाहीये.”
भूमी चित्रपटांपेक्षा आजकाल तिच्या कपड्यांमुळे चर्चेत येत असते. मध्यन्तरी सोनम कपूरने तिच्या घरी दिवाळीनिमित्त एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आता पार्टीत भूमी पेडणेकरलाही बोलावलं होतं. पण या पार्टीला भूमी ज्या कपड्यांमध्ये गेली ते पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं.