बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासूने काही महिन्यांपूर्वी गोंडस मुलीला जन्म दिला. बिपाशा व करण सिंग ग्रोवरला १२ नोव्हेंबरला कन्यारत्न झालं. त्यांनी आपल्या लेकीचे नाव ‘देवी’ असे ठेवले आहे. काही महिन्यांपूर्वी बिपाशाने तिच्या लेकीचे फोटो शेअर केले होते.

हेही वाचा- “याने पुन्हा इडल्या विकाव्यात…” पहिल्या चित्रपटानंतर सुनील शेट्टीची प्रसिद्ध समीक्षकाने उडवलेली खिल्ली

Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
Nylon manja seller arrested in Nashik Road area
नाशिकरोड परिसरात नायलॉन मांजा विक्रेता ताब्यात
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
Alia Bhatt
आलियाची लेक राहा कपूर आजीला कोणत्या नावाने मारते हाक? सोनी राजदान म्हणाल्या…
Opposition leaders hold protest in the Parliament complex over Adani issue
Priyanka Gandhi : ‘मोदी-अदाणी भाई भाई’ असं लिहिलेली बॅग घेऊन प्रियांका गांधी पोहचल्या संसदेत, राहुल गांधी म्हणाले, “क्यूट..”

बिपाशा सध्या चित्रपटांपासून दूर असली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. अनेकदा ती आपल्या लाडक्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतीच बिपाशा आणि करणने आपल्या सहा महिन्यांच्या मुलीसाठी नवी कार खरेदी केली आहे. या कारची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे. बिपाशा बसूने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या नवीन कारचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती पती करण सिंग ग्रोवरबरोबर Audi Q7 ची डिलिव्हरी घेताना दिसत आहे. कार घेण्यापूर्वी या जोडप्याने केक कापून आनंद साजरा केला. या व्हिडीओमध्ये बिपाशाने पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या शर्टसोबत व्हाइट जीन्स घातली आहे. व्हिडीओमध्ये बिपाशा खूप आनंदी दिसत आहे.

हा व्हिडीओ शेअर करीत बिपाशाने लिहिले की “देवीची नवीन सवारी. दुर्गा दुर्गा.” बिपाशाच्या या व्हिडीओवर तिचे चाहते कमेंट्सद्वारे अभिनेत्रीचे अभिनंदन करताना दिसत आहेत. काही वेळातच या व्हिडीओला हजारो लाइक्स मिळाले आहेत. बिपाशाच्या या लक्झरी कारची किंमत सुमारे ९२ लाख रुपये आहे.

मुलीच्या जन्मानंतर केवळ सहा महिन्यांनंतर बिपाशा जिममध्ये घाम गाळताना दिसली होती. तिने व्यायाम करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. व्हिडीओ शेअर करीत बिपाशाने कॅप्शनमध्ये लिहिले होते, ‘आई कधीच हार मानत नाही. मी पुन्हा माझे मजबूत व्हर्जन तयार करीत आहे.’

Story img Loader