९० च्या दशकात एका गाण्याने ही अभिनेत्री घराघरात प्रसिद्ध झाली. तिचं चित्रपटसृष्टीतील पदार्पणही जबरदस्त होतं, पण चुकीच्या चित्रपटांची निवड केल्यामुळे तिचं करिअर संपलं. सलग १२ फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर तिने लग्न केलं आणि संसारात रमली. लग्न करण्यापूर्वी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत राहिली होती. तिचं नाव जॉन अब्राहम, युवराज सिंग, सलमान रश्दी यांच्याशी जोडलं गेलं होतं. या अभिनेत्रीची आजी दिग्गज अभिनेत्री होती.

या अभिनेत्रीचा जन्म २४ जानेवारी १९८४ रोजी कोलकाता येथे झाला. तिचा जन्म एका राजघराण्यात झाला. तिची आजी व आई दोघाही अभिनेत्री होत्या, तर तिचे वडील राजघराण्याचे वंशज आहेत. या अभिनेत्रीचं नाव रिया सेन आहे. रियाची आई मुनमुन सेन व तिची आजी सुचित्रा दोघीही नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. तिची बहीण रायमा सेन बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नाव आहे. तिचे वडील भरत देव वर्मा हे त्रिपुराच्या राजघराण्यातील आहेत. ते कूचबिहारच्या राजकन्या इला देवी यांचे पूत्र आणि जयपूरच्या महाराणी गायत्री देवी यांचे पुतणे होते.

marathi actress entered in the new serial of star pravah
आधी ‘ठरलं तर मग’ मालिकेत झळकली; आता ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत एन्ट्री! ‘ती’ अभिनेत्री कोण? प्रोमो आला समोर…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
star pravah aboli serial new actress entry jahnavi killekar and mayuri wagh
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत २ नव्या अभिनेत्रींची एन्ट्री! जान्हवी किल्लेकरचा पहिला लूक आला समोर, तर दुसरी नायिका कोण?
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो
preity zinta los anjeles wildfire
लॉस एंजेलिसच्या अग्नितांडवात अडकली बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री; धक्कादायक अनुभव सांगत म्हणाली, “देवाचे आभार…”

४५ वर्षीय रिया सेनने २० व्या वर्षी मुख्य अभिनेत्री म्हणून २००१ मध्ये ‘स्टाइल’ या कॉमेडी चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पण त्याआधी ती बालकलाकार म्हणून १९९१ मध्ये ‘विषकन्या’ या हिंदी चित्रपटात झळकली होती. या सिनेमात तिची आई मुनमुन, कबीर बेदी आणि पूजा बेदी देखील होते. फाल्गुनी पाठकच्या ‘याद पिया की आने लगी’ या गाण्याने रिया सेनला लोकप्रियता मिळून दिली. त्यावेळी ती मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीची विद्यार्थिनी होती. ९० च्या दशकातील हे गाणं आजही ऐकायला मिळतं, इतकी त्याची क्रेझ आहे.

riya sen with parents
रिया सेन व तिचे आई-वडील (फोटो – इन्स्टाग्राम)

१२ चित्रपट झाले फ्लॉप

‘स्टाइल’नंतर तिचे बहुतांशी चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले. बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, २००६ मध्ये आलेल्या ‘अपना सपना मनी मनी’ या चित्रपटानंतर तिचे सलग १२ चित्रपट फ्लॉप ठरले. २०१६ मध्ये आलेल्या ‘डार्क चॉकलेट’ या चित्रपटातून तिने लक्ष वेधून घेतले. आता ती वेब सीरिजमध्ये काम करताना दिसते.

वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली रिया सेन

रिया सेन आपल्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली. रियाचे अफेअर एकेकाळी चर्चेचा विषय असायचे. जॉन अब्राहम बिपाशाआधी रियाबरोबर रिलेशनशिपमध्ये होता. या दोघांना लग्न करायचं होतं, पण नंतर ते वेगळे झाले. नंतर रियाचं नाव ‘मर्डर’ फेम अभिनेता अश्मित पटेलबरोबर जोडलं गेलं होतं. २००५ मध्ये तिचा व अश्मितचा एक एमएमएस लीक झाला होता, ज्यामुळे रिया आणि अश्मितमध्ये मतभेद झाले. काही लोकांनी रियाने लक्ष वेधून घेण्यासाठी स्वतःच हा एमएमएस जाणीवपूर्वक लीक केल्याचा आरोप केला होता, पण रिया आणि अश्मित दोघांनीही हा व्हिडीओ फेक असल्याचं म्हटलं होतं. हा एमएमएस लीक झाल्याचा रियाच्या करिअरला मोठा फटका बसला.

रियाचे नाव बुकर प्राइज विजेते सलमान रश्दी यांच्याशी जोडले गेले, परंतु नंतर तिने या अफवा फेटाळल्या. मग तिचे नाव पुन्हा क्रिकेटपटू युवराज सिंह आणि श्रीशांतबरोबरही जोडले गेले होते. अखेर तिने २०१७ मध्ये एका खासगी समारंभात बॉयफ्रेंड शिवम तिवारीशी बंगाली रितीरिवाजानुसार लग्न केले.

रिया सेन एक प्रशिक्षीत कथ्थक नृत्यांगना आहे. तिला किक बॉक्सिंगही येते. ती ‘बेली डान्सिंग’ही शिकली आहे. ती एक प्रशिक्षित योग शिक्षक देखील आहे.

Story img Loader