‘नो एण्ट्री’, ‘अपना सपना मनी मनी’, ‘गोलमाल रिटर्न्स’ या चित्रपटांमध्ये अभिनेत्री सेलिना जेटलीने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अनेक वर्ष बॉलीवूडमध्ये काम केल्यावर ही अभिनेत्रीने अचानक चित्रपटसृष्टीपासून दूर झाली. करिअरच्या सुरुवातीला तिने फॅशन इंडस्ट्रीत काम केले. सेलिनाने तिच्या या संपूर्ण प्रवासाबाबत माहिती देण्यासाठी नुकतीच एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा : “‘सुभेदार’ चित्रपटाच्या गाण्यामध्ये प्रेक्षकांना मिळणार आनंदाची बातमी”, मराठमोळ्या अभिनेत्याच्या ‘त्या’ पोस्टने वेधले लक्ष

ram kapoor praised rakhi sawant
ती मुंबईत 3 BHK सी फेसिंग बंगल्यात राहते; राखी सावंतबद्दल अभिनेत्याचं वक्तव्य; म्हणाला, “इंडस्ट्रीने तिचा गैरवापर…”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Mumbai Local Train Shocking Video viral
मुंबई लोकलच्या लेडीज डब्यात नशेबाज तरुणाचा धिंगाणा, महिलांसमोर थुंकला अन् हातवारे करुन…; पाहा धक्कादायक VIDEO
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
shradhha kapoor boyfriend
श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील ‘ती’ व्यक्ती कोण? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण
aishwarya narkar faces trolling for wearing sleeveless blouse
स्लिव्हलेस ब्लाऊजमुळे शिव्या घातल्या, संस्कृती दाखवली…; ऐश्वर्या नारकरांनी ट्रोलर्सना विचारला जाब, ‘तो’ अनुभव सांगत म्हणाल्या…

सेलिना जेटली या पोस्टमध्ये म्हणते, “मी अगदी लहान वयात फॅशन इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला. कोलकाता येथून सुरु झालेला माझा प्रवास सोपा नव्हता. आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला. किशोरवयात सुरुवातीला अभ्यासाचे प्रचंड दडपण होते. तेव्हा मला एंडोमेट्रिओसिस हा अत्यंत गंभीर आजार झाला होता. चेहऱ्यावर मुरुमे यायची, मासिक पाळी आल्यावर शरीरातील रक्त कमी होत असल्याने मला प्रत्येक महिन्यात मला रुग्णालयात दाखल व्हावे लागायचे. ते दिवस माझ्यासाठी अत्यंत कठीण होते.”

हेही वाचा : “गाडी थांबवून १५ मिनिटं रडलो”, ‘दुनियादारी’ चित्रपटाबद्दल दिग्दर्शकाने सांगितली जुनी आठवण; म्हणाले, “पुण्याला जाताना…”

सेलिना पुढे म्हणते, “माझे इतर मित्र-मैत्रिणी जेव्हा सुट्ट्यांचा आनंद घ्यायचे तेव्हा मी कोलकात्यात शूट आणि रॅम्प वॉक शो करायचे. अनेकवेळा कमी पैशांत काम केले आहे. प्रचंड मेहनत करूनही अनेकांनी माझे पैसे दिले नाहीत.”

हेही वाचा : शाहरुख खानचा ‘जवान’ पहिल्याच दिवशी कमावणार ‘इतके’ कोटी; प्रसिद्ध अभिनेत्याची भविष्यवाणी

“मी खूप जास्त गोरी आहे, खूप बारीक आहे, पुरेशी उंच नाही किंवा काही लोक बोलायचे खूप उंच आहेस अशा सगळ्या गोष्टी मी सहन केल्या. सतत टीका आणि नकार मिळत होता. अपमानास्पद गोष्टी ऐकाव्या लागल्या पण, यामुळे मी अधिक खंबीर झाले आणि आयुष्यात पुढे जात राहिले. निर्धार, शक्ती, समर्पण आणि संघर्ष यामुळे भविष्यात जागतिक पातळीवर देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला मिळाली.” असे लिहित सेलिनाने तिचा संपूर्ण प्रवास इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

Story img Loader