बॉलिवूडची लोकप्रिय सुपरस्टार जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह हे दोघे चित्रपटांबरोबरच त्यांच्या पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असतात. ऑनस्क्रीन दीपिका आणि रणवीरची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळते, तसेच ऑफस्क्रीनही त्यांचं छान बाँडिंग आहे. अलीकडेच या क्यूट जोडीने मुंबईत ११९ कोटींचे अलिशान घर खरेदी केले आहे. हे दीप-वीरचे ‘ड्रिम हाऊस’ असल्याचे म्हटले जात आहे. आता या ‘ड्रीम हाऊस’चा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दीपिका-रणवीरच्या ‘ड्रीम हाऊस’चा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये दीपिका-रणवीरचे ‘ड्रीम हाऊस’ तुम्ही पाहू शकता. सध्या या अलिशान घरामध्ये दीपिका आणि रणवीर राहत नसून इमारतीचे अद्याप काम सुरू आहे.
आणखी वाचा : “माझ्या हृदयाचा तुकडा…” दीपिका पदुकोणने रणबीर कपूरचा फोटो केला शेअर, पोस्ट चर्चेत

दीपिका-रणवीर होणार शाहरुखचे शेजारी

दीपिका-रणवीरचे हे ‘ड्रीम हाऊस’ समुद्राच्या अगदी जवळ आहे. किंग खानच्या ‘मन्नत’ बंगलापासून हाकेच्या अंतरावर दीप-वीरचे हे नवे घर आहे. ‘द इकोनॉमिक टाईम्स’च्या वृत्तानुसार, बँडस्टँडच्या सागर रेशम इमारतीमधील १६, १७, १८ आणि १९ मजला ११९ कोटींना दीपिका-रणवीरने खरेदी केला असून हेच त्यांचे ‘ड्रीम हाऊस’ आहे. काही दिवसांपूर्वीचे दीपिका-रणवीरने या घराची पाहणी केली होती.

आणखी वाचा : दीपिका पदुकोणने इन्स्टाग्रामवरील नावात केला मोठा बदल…जाणून घ्या कारण

आणखी वाचा : “आपला प्रवास वेगळा… ” दीपिका पदुकोणने प्रेम व लग्नावर केलं भाष्य; मानसिक आरोग्य तज्ज्ञांनी दिली प्रतिक्रया

दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, रणवीरचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणवीर व आलिया भट्टची जोडी पाहायला मिळणार आहे. तर दीपिका लवकरच ‘जवान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच तिचा ‘फायटर’ चित्रपट २०२४ ला प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress deepika padukone and ranveer singh new home bandra video viral pps