अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता हृतिक रोशन ही नवी जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘फायटर’ या चित्रपटातून या नव्या जोडीची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. नुकताच ‘फायटर’ चित्रपटातील हृतिकचा पहिला लूक दीपिकानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे सध्या हृतिकच्या ‘फायटर’मधील लूकची चर्चा सुरू आहे.
दीपिका पदुकोणनं ‘फायटर’ चित्रपटातील हृतिकचा पहिला लूक शेअर करत चाहत्यांना एक प्रश्न विचारला आहे. तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “मी या चित्रपटात हृतिकला कोणत्या नावानं हाक मारत असेल? तुम्हाला काय वाटतं?” या प्रश्नावर दीपिकांच्या चाहत्यांनी मजेशीर उत्तरं दिली आहेत. कोणी ‘बाबा’, तर कोणी ‘शुगर लिप्स’, ‘फायटर’ अशी उत्तरं दिली आहेत. यामध्ये ‘फायटर’ चित्रपटातील अभिनेता करण सिंह ग्रोवरनंही सहभाग घेतला. तो म्हणाला की, “तू याला काय हाक मारते, हे मला ठाऊक आहे.”
हेही वाचा – मराठमोळ्या अभिनेत्रीच्या चित्रपटासाठी अभिषेक बच्चन करत होता प्रॉडक्शन बॉयचं काम; किस्सा सांगत म्हणाली…
तसंच काही जणांनी ‘फायटर’ची तुलना ही टॉम क्रूझच्या ‘टॉप गन मेवरिक’ चित्रपटाबरोबर केली आहे. एक चाहता दीपिकाच्या प्रश्नाचं उत्तर देतं म्हणाला की, “स्वस्तातला टॉम क्रूझ.’ पण आता नक्की दीपिका हृतिकला या चित्रपटात कोणत्या नावानं हाक मारते, हे येत्या काळात समजेल.

हेही वाचा – अपयशाची भीती वाटतेय? मराठमोळी उर्मिला निंबाळकर सल्ला देत म्हणाली, “फक्त यशस्वी…”
दरम्यान, ‘पठाण’ चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद ‘फायटर’चे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटात दीपिका आणि हृतिकसह अनिल कपूर आणि करण सिंह ग्रोवर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सध्या या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. २५ जानेवारी २०२४ रोजी ‘फायटर’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.