ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांची लेक मसाबा गुप्ता तीन महिन्यांपूर्वी आई झाली. प्रसिद्ध फॅशन डिझायनर व अभिनेत्री मसाबाने तिच्या लेकीचं नाव जाहीर केलं आहे. लेकीबरोबरचा एक फोटो पोस्ट करत तिने मुलीचं नाव आणि त्या नावाचा अर्थ सांगितला.
मसाबा गुप्ता व तिचा पती अभिनेता सत्यदीप मिश्रा दोघेही ११ ऑक्टोबर २०२४ रोजी आई-बाबा झाले. मसाबाने मुलीला जन्म दिला. मसाबा व सत्यदीप यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून ही बातमी दिली होती. तसेच मसाबाची आई नीना गुप्ता यांनी आजी झाल्यावर नातीबरोबरचा एक गोंडस फोटो पोस्ट केला होता. लाडकी लेक तीन महिन्यांची झाल्यावर मसाबाने तिच्या नावाचं ब्रेसलेट घातलेला एक फोटो पोस्ट केला आहे.
हेही वाचा – माधुरी दीक्षित व गौरी खानने शेअर मार्केटमध्ये केली गुंतवणूक, कोणत्या कंपनीचे शेअर्स घेतले? वाचा
मसाबाने पोस्ट केलेल्या फोटोत तिच्या लेकीचा हात दिसतोय. त्याचबरोबर ‘मतारा’ (Matara) नावाचं ब्रेसलेट घेततेला मसाबाचा हात दिसत आहे. मसाबाने या पोस्टमध्ये मतारा नावाचा अर्थही (Matara Name Meaning) सांगितला आहे. “माझी मतारा तीन महिन्यांची झाली. हे नाव नऊ हिंदू देवींच्या दैवी स्त्री शक्तींचे प्रतीक असून त्यांची शक्ती आणि बुद्धीमत्ता दर्शवते,” असं मसाबाने कॅप्शनमध्ये लिहिलं.
हेही वाचा – एकाच मालिकेतील तिसरी अभिनेत्री झाली आई, तिघींच्याही घरी मुलींचा जन्म, पोस्ट शेअर करून दिली आनंदाची बातमी
पाहा पोस्ट –
मसाबा व सत्यदीप या दोघांनी जानेवारी २०२३ मध्ये गुपचूप लग्न करून फोटो शेअर केले होते. लग्नानंतर जवळपास दीड वर्षांनी त्यानंतर १८ एप्रिल २०२४ रोजी त्यांनी इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी दिली होती. मसाबा व सत्यदीप यांच्या घरी ११ ऑक्टोबरला लेकीचं आगमन झालं.
हेही वाचा – “त्याची आई अजूनही…”, किरण रावचं आमिर खानच्या कुटुंबाबद्दल भाष्य; त्याच्या मुलांची नावं घेत म्हणाली…
मसाबा व सत्यदीप या दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. काही काळ एकमेकांना डेट केल्यावर दोन वर्षांपूर्वी त्यांनी अगदी साधेपणाने लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाला दोघांचे कुटुंबीय उपस्थित होते. मसाबाचे वडील क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्सदेखील या लग्नाला आले होते. मसाबाचं पहिलं लग्न मधू मंटेनाशी झालं होतं, तर सत्यदीप मिश्राचं लग्न अदिती राव हैदरीशी झालं होतं.