दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नव्या नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या मागणीवरून देशभरात चांगलाच गदारोळ माजला आहे. राजकीय व्यक्तींपासून ते बॉलिवूडचे कलाकार त्यांच्या या मागणीवर टीका करत आहे. संगीतकार विशाल याने टीका केल्यानंतर आता प्रसिद्ध अभिनेत्री गौहर खानने टीका केली आहे. आपल्या ट्विटवर अकाऊंटवरून तिने ना न घेता टीका केली आहे.

चित्रपट, वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणाऱ्या गौहरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहले की ‘जो नेता फक्त विकासावर लक्ष केंद्रीत करतो तोही राजकारणातील जिंकण्याच्या शर्यतीचा बळी ठरला आहे. केवळ कमकुवत राजकारणीच धर्माचा वापर करतात. राज्याची निवडणूक जिंकण्याची भूक तुम्हाला खूप वेगळं बनवते. हे खूप दुःखदायक आहे. मी अन फॉलो करत आहे’. अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिनेत्री गौहर खान नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहत आपलं मत मांडत असते. व्यवसायिक, समाजिक पातळीवर घडणाऱ्या अनेक घटनांवर ती भाष्य करत असते. साजिद खान बरोबर जमणार होते, मात्र काही कारणांमुळे ते नाही. साजिद खाननंतर गौहर खान आणि कुशल टंडन एकमेकांना डेट करत होते. २०१४ मध्ये दोघांचा ब्रेकअप झाला. कुशलने सोशल मीडियावरुन गौहर खानसोबतच्या ब्रेकअपची माहिती दिली होती.

Story img Loader