सध्या सगळीकडे २०२५ या नवीन वर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक सेलिब्रिटी २०२४ या वर्षातील काही खास आठवणी शेअर करत नववर्षाचं स्वागत करताना दिसत आहेत. मात्र एका बॉलीवूड अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ पाहिल्यानंतर ती दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. कारण तिने पोस्ट केलेल्या व्हिडीओत तिचा एक फोटो आहे, ज्यात तिच्या हातात प्रेग्नेंसी टेस्ट किट दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बर्फी’ फेम बॉलीवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझ तिच्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. इलियानाने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून २०२४ ची खास झलक दाखवली. इलियानने शेअर केलेल्या व्हिडीओ जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्यांमधील खास क्षणांची झलक पाहायला मिळतेय. काही महिन्यांमध्ये ती व तिचा पती बाळाबरोबर वेळ घालवताना दिसतात. तर काही फोटोंमध्ये व्हेकेशनची झलक पाहायला मिळतेय. काहींमध्ये तिचा वर्षभराचा मुलगा चालायला शिकला, तेव्हाचे सुंदर क्षण आहेत.

हेही वाचा – ‘सैराट’ फेम तानाजी गाळगुंडेच्या गर्लफ्रेंडने दिली प्रेमाची कबुली? अभिनेत्याबरोबरचा ‘तो’ फोटो पोस्ट करून लिहिलं….

इलियानाच्या व्हिडीओत ऑक्टोबर महिन्यात ती हातात प्रेग्नेंसी टेस्ट किट घेऊन दिसत आहे. यानंतर ती दुसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा होत आहे. इलियानाच्या या पोस्टवर चाहते कमेंट्स करून तिला शुभेच्छा देत आहेत.

हेही वाचा – ९ वर्षे रखडला, ८ कलाकारांनी नाकारला अन् नंतर ब्लॉकबस्टर ठरला; तुम्ही पाहिलाय का ‘हा’ चित्रपट?

पाहा व्हिडीओ –

२०२३ मध्ये आई झाली इलियाना

इलियाना डिक्रुझच्या जोडीदाराचे नाव मायकल डोलन आहे. त्यांनी गुपचूप लग्न केलं होतं, असं म्हटलं जातं. पण इलियाना किंवा मायकलने याबद्दल कधीच प्रतिक्रिया दिलेली नाही. इलियानाने ती आई होणार असल्याची घोषणा केल्यावर तिच्या लग्नाबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर तिने जोडीदार मायकल डोलनचे काही फोटो शेअर केले होते. हे दोघेही ऑगस्ट २०२३ मध्ये आई बाबा झाले. त्यांच्या मुलाचे नाव कोआ फीनिक्स डोलन आहे. इलियाना अनेकदा मुलाचे व पतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

हेही वाचा – नेटफ्लिक्सवर एकाच वेब सीरिजचे ३ सीझन ट्रेंडिंग; वाचा मागील आठवड्यात सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या १० सीरिजची यादी!

इलियानाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती अखेरची ‘दो और दो प्यार’ या सिनेमात दिसली होती. या चित्रपटात विद्या बालन, प्रतीक गांधी व सेंधिल राममूर्ती हे कलाकार होते. हा चित्रपट सध्या डिस्ने+ हॉटस्टारवर उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress ileana dcruz second pregnancy video viral on social media hrc