बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री इलियाना डिक्रुझ आई झाली आहे. इलियानाने नुकतंच एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. त्याबरोबरच तिने बाळाची झलकही दाखवली आहे. तसेच तिने त्याच्या नावाचाही खुलासा केला आहे.

इलियानाने शनिवारी ५ ऑगस्टला इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने बाळाचा फोटो शेअर करत चाहत्यांना त्याची झलक दाखवली. “आमच्या लाडक्या मुलाचे या जगात स्वागत करताना आम्हाला किती आनंद होतोय, हे आम्ही शब्दात मांडू शकत नाही. मन आनंदाने भरून आलंय”, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.
आणखी वाचा : इलियाना डिक्रुझने पहिल्यांदाच दाखवला होणाऱ्या बाळाच्या बाबांचा चेहरा, फोटो शेअर करत म्हणाली…

इलियानाने तिच्या बाळाचे नाव ‘कोआ फिनिक्स डोलन’ असे ठेवले आहे. तिने १ ऑगस्ट २०२३ रोजी बाळाला जन्म दिला. इलियानावर सध्या चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इलियानाने १८ एप्रिल रोजी तिच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. तिने बेबी बंप दाखवत एक फोटो शेअर केला होता. यानंतर या बाळाचा बाबा कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र अद्याप तिने याबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही.

Story img Loader