जॅकलिन फर्नांडिसला २०० कोटींच्या मनी लाँडरींग प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. ‘पटियाला हाऊस’ न्यायालयाने मंगळवारी अभिनेत्रीला २ लाख रुपयांचार जामीन मंजूर केला आहे. १० नोव्हेंबर रोजी कोर्टात जॅकलिनच्या जामिनावर युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. त्याचबरोबर आता अभिनेत्रीला सशर्त जामीन देण्यात आला असल्यामुळे जॅकलीनची एका संकटातून मुक्तता झाली आहे.
सुकेश चंद्रशेखरसोबत २०० कोटींच्या मनी लाँडरींग प्रकरणात नाव आल्याने जॅकलिन चांगलीच अडचणीत सापडली होती. त्याचबरोबर अभिनेत्रीला सुकेशकडून मिळालेल्या महागड्या भेटवस्तूबद्दल अनेकवेळा चौकशीदेखील करण्यात आली. तेव्हापासून जॅकलिन अंतरिम जामिनावर होती. पण ११ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत जॅकलिन पुराव्यांशी छेडछाड करू शकते किंवा परदेशात पळून जाऊ शकते अशी शंका उपस्थित करत इडीने यामध्ये आणखी भर घातली.
आणखी वाचा : “त्या रक्षासाला…” श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी अभिनेत्री स्वरा भास्करने व्यक्त केला संताप; ट्वीट व्हायरल
जॅकलिनच्या जामीनाला ईडीने चांगलाच विरोध दर्शवला. अभिनेत्रीने ७.१४ कोटी रुपयांचा गंडा घातला होता आणि परदेशात पळून जाण्यासाठी पुरेसा पैसा तिच्याकडे होता. त्यामुळे जॅकलिनला जामीन देऊ नये असा तकादाच ईडीने लावला होता. हे पाहता जॅकलिनने ईडीवर मानसिक छळ केल्याचा आरोपही केला होता. त्यांनंतर तिला जर परदेशात जायचे असेल तर ती न्यायालयाच्या परवानगीने जाऊ शकते असंदेखील न्यायालयाने सूचित केलं होतं, पण आता मात्र जॅकलिनला मनी लाँड्रिंग प्रकरणात पटियाला न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला ५.७१ कोटी रुपयांची भेटवस्तू दिल्याचे ईडीने सिद्ध केले होते. जॅकलिनच्या वतीने स्क्रिप्ट लिहिण्यासाठी जॅकलिनच्या कुटुंबाला १.३ कोटी रुपये आणि वेब सीरिजच्या लेखकाला १५ लाख रुपयेसुद्धा सुकेशनेच दिले होते. त्याचवेळी जॅकलिनने ईडीला सांगितले होते की सुकेशने तिला प्रत्येक आठवड्याला वीन एल्कलाइन पाण्याच्या बाटल्या, एक ऊंची परफ्यूम, प्रत्येकी नऊ लाखांच्या तीन मांजरी आणि ५२ लाख किमतीचा एक अरबी घोडा दिला होता. याशिवाय सुकेशने जॅकलिनला अनेक गोष्टी दिल्या होत्या. इतकंच नाही तर अरविंद केजरिवाल यांच्या ‘आम आदमी पार्टी’लाही करोडो रुपये दिल्याचं सुकेशने स्पष्ट केलं होतं.