बॉलीवूडमधील बरेच कलाकार वांद्र्यामधील पाली हिल येथे राहतात. काही दिवसांपूर्वी या भागातील दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्या ड्रीम हाऊसचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर आता अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या आलिशान घराचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लवकरच जॅकलिन फर्नांडिस ही कपूर कुटुंबीयांची शेजारी होणार आहे.

सेलिब्रिटी ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवर जॅकलिन फर्नांडिसच्या वांद्र्यातील आलिशान घराचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘टाइम नाउ’च्या वृत्तानुसार, जॅकलिनचं नवं घर हे रणबीर कपूर, करीना कपूर यांच्या घराशेजारी आहे. तसेच जॅकलिनच्या घराच्या हाकेच्या अंतरावर सलमान खान व शाहरुख खानचंही घर आहे.

chris evans back to marvel films
‘कॅप्टन अमेरिका’ फेम अभिनेता क्रिस एव्हान्सचं मार्व्हल सिनेमात पुनरागमन; ‘या’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Tula Shikvin Changalach Dhada Fame Virisha Naik Wedding
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्री अडकली लग्नबंधनात! नवरा ‘या’ लोकप्रिय मालिकेत करतोय काम, फोटो आले समोर
myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Punha Kartvya Aahe
Video: “हिला अन्न-पाणी…”, आईच्या विरोधात जाऊन आकाश वसुंधराची साथ देणार; नेटकरी म्हणाले, “नवरा-बायकोमधील नातं…”

हेही वाचा – रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकललं, ऑगस्टऐवजी ‘या’ महिन्यात होणार रिलीज

हेही वाचा – सोनू सूदनं रिया चक्रवर्तीसाठी बनवला डोसा, व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले; म्हणाले, “सुशांत सिंह राजपूतचा खून….”

अनेक वृत्तांनुसार- जॅकलिनचं नवं घर पाली हिलच्या नवरोज बिल्डिंगमध्ये आहे. या बिल्डिंगमधील सर्वांची घरं १११९ स्क्वेअर फूट ते २,५५७ स्क्वेअर फूट कार्पेट एरियादरम्यान आहेत. तशीच सर्व अपार्टमेंट ३ बीएचके आणि ४ बीएचके अशी आहेत. या अपार्टमेंटची किंमत १२ कोटी रुपयांपासून सुरू होते. शिवाय इथे क्लब हाऊस, स्विमिंग पूल व जिम अशा सुविधाही आहेत.

हेही वाचा – …अन् सलमान खानने ‘बिग बॉस ओटीटी’च्या प्रेक्षकांची मागितली जाहीर माफी, नेमकं काय घडलं?

जॅकलिनच्या कामकाजाबद्दल बोलायचं झालं, तर लवकरच ती वैभव मिश्राच्या ‘फतेह’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर अभिनेता सोनू सूद व विजय राज असणार आहेत. शिवाय जॅकलिन आदित्य दत्तच्या ‘क्रॅक जितेगा तो जिएगा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटामध्ये जॅकलिनबरोबर विद्युत जामवाला व अर्जुन रामपाल हेही प्रमुख भूमिका निभावणार आहेत.

Story img Loader