Anant Ambani Radhika Merchant 2nd Pre-Wedding : अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा पार पडला आहे. २९ मे पासून सुरू झालेला हा दुसरा प्री-वेडिंग सोहळा काल, १ जूनला संपला. इटली ते फ्रान्स असा क्रूझवर प्रवास करत अनंत-राधिकाचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा मोठ्या धुमधडाक्यात झाला. या सोहळ्याला बॉलीवूड सेलिब्रिटींसह अनेक दिग्गज मंडळींनी उपस्थिती लावली होती. पण ‘नो फोन पॉलिसी’ असल्यामुळे बॉलीवूड सेलिब्रिटींनी प्री-वेडिंगदरम्यान फोटो, व्हिडीओ शेअर केले नाहीत. पण आता प्री-वेडिंग झाल्यानंतर बॉलीवूडचे कलाकार सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. अशातच जान्हवी कपूर व तिचा बॉयफ्रेंड शिखर पहारियाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री जान्हवी कपूर आणि शिखर पहारियाचं नातं आता जगजाहीर आहे. नेहमीच दोघांचे फोटो, व्हिडीओ व्हायरल होतं असतात. नुकताच दोघांचा अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमधला व्हिडीओ समोर आला आहे; जो इटलीमधील आहे.

हेही वाचा – “आपल्याकडे गोंधळाचं वातावरण…”, लोकसभा निवडणुकीच्या निकालावर आनंद इंगळेंचं भाष्य, म्हणाले, “भूमिका बदलणाऱ्यांना…”

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर जान्हवी व शिखरचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत जान्हवी व शिखर आपल्या नातेवाईक व मित्र-मैत्रीणींबरोबर प्री-वेडिंग एन्जॉय करताना दिसत आहेत. तसंच अभिनेत्री गप्पा मारत दुसऱ्या बाजूला बॉयफ्रेंडला जेवणाचा घास भरवताना पाहायला मिळत आहे. जान्हवी व शिखरच्या या व्हिडीओने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – ‘मिस्टर अँड मिसेज माही’ची ओपनिंग दमदार पण दुसऱ्या दिवशी मंदावला वेग, केली ‘इतकी’ कमाई

दरम्यान, जान्हवी कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सध्या तिचा ‘मिस्टर अँड मिसेज माही’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटात जान्हवी अभिनेता राजकुमार रावबरोबर झळकली आहे. ३१ मेला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत दोन दिवसांत एकूण ११.२५ कोटींचा व्यवसाय केला आहे. शरण शर्मा दिग्दर्शित ‘मिस्टर अँड मिसेज माही’ चित्रपटात राजकुमार राव व जान्हवी कपूर क्रिकेट प्रेमी दाखवण्यात आले असून दोघांनी पती-पत्नीची भूमिका निभावली आहे. राजकुमार व जान्हवी दुसऱ्यांदा एकत्र झळकले आहेत. यापूर्वी ‘रूही’ चित्रपटात दोघं पाहायला मिळाले होते. राजकुमार राव व जान्हवीचा हा चित्रपट फ्लॉप झाला होता, पण दोघांची केमिस्ट्री हिट झाली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress janhvi kapoor is feeding to boyfriend shikhar pahariya at anant ambani radhika merchant 2nd pre wedding video viral pps