बॉलीवूडचे कलाकार हे कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. हे कलाकार कधी त्यांचे चित्रपट, कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट, तर कधी त्यांची वक्तव्ये यांमुळे चर्चांचा भाग बनतात. आता बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूने एका मुलाखतीदरम्यान, आपल्या खासगी आयुष्याविषयीचा खुलासा केल्याने ती मोठ्या चर्चेत आली आहे.

काय म्हणाली जान्हवी कपूर?

अभिनेत्री जान्हवी कपूर शिखर पहारियाबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगताना तिने म्हटले आहे की, शिखरला डेट करताना पहिल्या दोन वर्षांत मला मासिक पाळी आल्यानंतर मी प्रत्येक महिन्याला त्याच्याबरोबर ब्रेकअप करायचे आणि दोन दिवसांनंतर त्याच्याकडे रडत जात त्याची माफी मागायचे. मला कळायचंच नाही की, मी अशी का वागत आहे, माझे ते वागणं अतिरेकी होतं. पहिले दोन-तीन महिने तो शॉकमध्ये होता; पण त्यानंतर त्यानं समजून घेतलं. पुढे तिने म्हटले आहे की, माझं आणि शिखरचं नातं तुटलं होतं. शिखरमुळेच माझं मन दुखावलं गेलं होतं; पण त्याच्यामुळेच नंतर सगळ्या गोष्टी ठीक झाल्या.
चित्रपटसृष्टीत येण्याआधी शिखर आणि जान्हवी कपूर एकमेकांना डेट करीत होते; मात्र काही काळानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर जान्हवी कपूर तिच्या धडक या पहिल्या चित्रपटातील सहकलाकार इशान खट्टरला डेट करीत होती. मात्र, इशान खट्टरबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर शिखर आणि जान्हवी यांनी पुन्हा एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ

हेही वाचा : “हा घटस्फोट अत्यंत सुखद…”, किरण रावने आमिर खानपासून वेगळे झाल्यानंतरच्या आयुष्याबद्दल केले भाष्य

जान्हवी लवकरच तिच्या उलझ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्यामध्ये जान्हवी कपूर सुहानाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तरुण डेप्युटी हाय कमिशनर म्हणून सुहाना काम करताना दिसत आहे; जी लंडन दूतावासातील कठीण मोहिमेवर बारीक नजर ठेवते. ‘उलझ’ चित्रपटात अभिनेता गुलशन देवैया एका गुप्तहेराच्या भूमिकेत आहे. त्याबरोबरच रोशन मॅथ्यूदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या ट्रेलरमध्ये गुप्तहेरांचे जीवन कसे धोक्यात येते आणि सुहानाला जगण्यासाठी कसा संघर्ष करावा लागतो, याबद्दलची गोष्ट पाहायला मिळत आहे. सुधांशु सारिया दिग्दर्शित ‘उलझ’ चित्रपट २ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ‘उलझ’ चित्रपटातील जान्हवी कपूरचे सहकलाकार राजेश तैलंग यांनी जान्हवीमध्ये तिची आई व दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची झलक दिसत असल्याचे म्हटले होते. जान्हवीचे कौतुक करताना, “जान्हवी सहज अभिनय करणारी आणि जमिनीवर पाय असणारी अभिनेत्री आहे. आम्ही सगळे तिच्या आईचे चाहते होतो. तिच्यात तुम्हाला श्रीदेवीची झलक पाहायला मिळेल”, असे म्हटले होते.

Story img Loader