बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या बोल्ड लूकमुळे कायम चर्चे असते. सोशल मीडियावरही ती चांगलीच सक्रिय असते. जान्हवीने जास्त चित्रपट केले नसले तरी तिच्या परीने उत्तम काम करायचा प्रयत्न करत असते. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांची मुलगी म्हणून जरी लोकं तिला ओळखत असले तरी ती कायम स्वतःला सिद्ध करायचा प्रयत्न करत असते. आईसारखी लोकप्रियता कोणालाच मिळणार नाही असं वक्तव्य नुकतंच केलं आहे.

‘गुडटाइम्स’शी संवाद साधताना तिने श्रीदेवी यांच्या लोकप्रियतेबद्दल आणि त्यांना मिळालेल्या प्रेमाबद्दल भाष्य केलं आहे. जान्हवी म्हणाली, “आईला जेवढी लोकप्रियता मिळाली त्याच्या आसपासही कुणालाच पोहोचता येणार नाही असं मला वाटतं. ती जेव्हा चित्रपटात काम करत होती तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता, तीने चित्रपटातून ब्रेक घेतल्यानंतर माझा जन्म झाला. पण तिच्याबरोबर काम केलेली लोकं आज जेव्हा तितक्याच आत्मीयतेने बोलतात तेव्हा मला तिच्या कामाची, तिच्या योगदानाची जाणीव होते. ही गोष्ट खूप दुर्मिळ आहे, ती पुन्हा घडणार नाही.”

आणखी वाचा : “अमिताभ बच्चन नावाचं अग्निकुंड…” राज ठाकरेंनी खास शैलीत दिल्या महानायकाला शुभेच्छा

जान्हवी ही श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची पहिली मुलगी. कित्येक वर्षं चित्रपटात काम केल्यानंतर १९९७ मधील ‘जुदाई’ या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर श्रीदेवी यांनी चित्रपटात काम करणं कमी केलं. नंतर जान्हवीचा जन्म झाला आणि थेट २०१२ साली श्रीदेवी यांनी ‘इंग्लिश वींग्लिश’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुन्हा पदार्पण केलं. या चित्रपटातील त्यांची भूमिका लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली.

सोशल मिडियावर जान्हवीची तुलना सतत तिच्या आईबरोबर होताना आपल्याला दिसते. जान्हवीने ‘गुंजन सक्सेना’सारख्या चित्रपटात उत्तम अभिनय करूनही तिला नेपोटीजमच्या नावाखाली ट्रोल केलं जातं. जान्हवीने ‘सैराट’च्या हिंदी रिमेक म्हणजेच ‘धडक’मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. जान्हवी आता आगामी ‘मिलि’ आणि ‘बवाल’ या चित्रपटात झळकणार आहे. शिवाय तिची लहान बहीण खुशी कपूरही झोया अख्तरच्या आगामी सीरिजमधून पदार्पण करणार आहे.

Story img Loader