बॉलिवूड अभिनेत्री काजोल दरवर्षी नवरात्रीत दुर्गापूजेत सहभागी होते. यंदाही तिने तिच्या कुटुंबासह दुर्गापूजेला हजेरी लावली. यावेळीचे तिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या कार्यक्रमादरम्यान काजोलच्या एका व्हिडीओने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या सर्वत्र नवरात्री उत्सवाची धामधूम पाहायला मिळत आहे. मोठ्या थाटामाटात नवरात्रौत्सव साजरा केला जात आहे. सर्वसामान्यांपासून ते अगदी मोठमोठ्या कलाकारांपर्यंत सर्वजण देवीच्या भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचे दिसत आहेत. विविध बॉलिवूड कलाकरही विविध मंडळात जाऊन देवीचे आशीर्वाद घेताना दिसत आहेत.
आणखी वाचा : “…तर त्यांनी मला नक्कीच बसवलं असतं”, अशोक सराफ यांना सुनावणाऱ्यांवर भडकले भाऊ कदम, म्हणाले “कृपया…”

नुकतंच एका दुर्गापुजेवेळी काजोल तिचा मुलगा युगसह सहभागी झाली होती. यावेळी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत काजोल ही मोबाईलमध्ये बघत बघत चालताना दिसत आहे. मात्र चालता चालता समोर दुर्लक्ष झाल्याने काजोलचा तोल जातो आणि ती खाली पडते.

पण सुदैवाने तिथे इतर लोक असल्याने ते तिला सावरतात. यावेळी तिचा मोबाईल खाली पडतो. पण आजूबाजूला इतर लोक असल्याने तिला दुखापत होत नाही. यानंतर तिचा मुलगा युग तिची विचारपूस करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : “हृदयाला छिद्र, रक्तवाहिन्या बंद आणि फक्त सहा महिने…” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग, म्हणाली “तिला भूल देणंही…”

काजोलच्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत. “ही नेहमीच पडत असते”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने “स्टाईल मारत राहिलात तर असंच होतं”, असे म्हटले आहे. तर एकाने “मोबाईल पाहणं इतकं गरजेचे आहे का”, असा प्रश्न विचारला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress kajol almost falls off stage drops her phone during durga puja nrp